आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फ्यूचर मेकर'च्या नाशकातील मालमत्तेचा पाेलिस घेणार शाेध; गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फ्यूचर मेकर लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये कोट्यवधीचा अपहार उघडकीस आल्यानंतर हरियाणातील हिसार, सोनीपत, पानिपत, यासह देशभरातील कंपनीच्या मालमत्तेचा शोध तेलंगणा पोलिसांकडून घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुंबई, पुणेपाठाेपाठ नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील कंपनीच्या मालमत्तेची अाणि कंपनीचे अधिकारी, एजंटचा शाेध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात अाले. या प्रकाराने शेकडो गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अस्वस्थता पसरली अाहे. 


नाशिकसह धुळे, जळगाव येथील गुंतवणूकदारांनी ज्या मध्यस्थामार्फत पैसे गुंतवले त्यांच्याकडे तगादा लावला असल्याचे समजते. काही गुंतवणूकदार पोलिसांत तक्रार देण्यासाठी विधिज्ञांचा सल्ला घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. रविवारी अार्थिक गुन्हा शाेध कार्यालयात सुट्टी असल्याने काेणी तक्रार देण्यासाठी फिरकले नसले तरी ग्रामीण भागातून तक्रारदार पुढे येण्याची शक्यता ग्रामीण पाेलिसांनी वर्तविली. केबीसी, इमू, मैत्रेय या कंपनीकडून नाशिकमधील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालण्याचा प्रकार ताजा असताना आता हिसारमधील फ्यूचर मेकर लाईफ इन्शुरन्स कंपनीने देशभरात आठ हजार कोटींना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेलंगणा पोलिसांनी हिसारमध्ये कंपनीचे कार्यालय सील केले. त्यापाठाेपाठ हैद्रराबाद येथे पाेलिस अायुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन कंपनीच्या देशभरातील जाळे खणून काढणार असल्याचे व कंपनीच्या अधिकाऱ्यांची मालमत्ता तपासली जाणार अाहे. यामध्ये नाशिकसह जळगाव, धुळे येथील शेकडो गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती समोर अाली अाहे.कंपनीच्या विरोधात द प्राइज चिट फंड अँड मनी सर्कुलेशन अॅक्ट १९७८ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीमधून पथकाने हार्ड डिस्क, लॅपटॉप आदी महत्वाचे कागदपत्र जप्त केले आहे. याआधारे देशभरातील ४० ते ५० लाख नागरिकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. 

 

ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणात गुंतवणूकदार 
कंपनीकडून ७ हजार ५०० रुपये गुंतवल्यास सभासदत्व दिले जात असून त्यापुढे एकेक सभासद जाेडत गेल्यास पहिल्या क्रमांकाच्या सभासदास अापाेअाप ५०० रुपये मिळत जातात. त्याचप्रमाणे साडेसात हजार रुपयांत कंपनीकडून ग्राहकाला जैविक खतांचे उत्पादन व इतर अायुर्वेदिक साहित्य देण्यात येत हाेते. यासह काही एजंटांनी तर स्वत:च्या घरातीलच अाठ ते दहा क्रमांक काढून स्वत:च सभासद झाले अाहेत. मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या या याेजनेत नाशिक शहरासह ग्रामीण भागातील नामपूर, सटाणा, कळवण, दाभाडी, मालेगाव या भागातील शेतकरीदेखील अामिषाला बळी पडल्याचे बाेलले जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...