आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Will Tell 2 Lakh Students Think About Your Future, Wait For The Right Time For Marriage.

रोज दोन मुली पळून जातात, पोलिस २ लाख विद्यार्थ्यांना सांगणार- आपल्या भविष्याचा विचार करा, लग्नाच्या योग्य वेळेची वाट पाहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - शहरात दररोज २ अल्पवयीन मुली घर सोडून प्रियकरासोबत पळ काढतात. या मुलींचे वय १३ ते १६ वर्षे आहे. विद्यार्थिनींनी पळ काढण्याच्या, दरमहा ५० पेक्षा जास्त प्रकरणांची न‌ोंद केली जात आहे. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिस १० डिसेंबरपासून मोहीम राबवणार आहेत. ‌‌‌याअंतर्गत सहायक पोलिस आयुक्त विधी चौधरी सहकाऱ्यांसह शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची समजूत काढणार आहेत. हे बेकायदेशीर असून यामुळे भविष्याचे नुकसान होते, असा सल्ला त्या विद्यार्थिनींना देणार आहेत. तसेच परिवाराची काळजी करा आणि लग्नाच्या योग्य वयाची वाट बघा, असा सल्ला पोलिस देणार आहेत. अप्लवयात लग्न केल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती मुलींना देण्यात येईल. यापूर्वी ४ लाख मुलींना दिली होती चांगल्या व वाईट स्पर्शाची माहिती

यापूर्वी सहायक पोलिस आयुक्त विधी चौधरी यांनी अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी गुड टच बॅड टच मोहीम राबवली होती. यामध्ये सुमारे ४ लाखांहून अधिक मुलींना माहिती देण्यात आली आणि गुन्हेगारांना कसे टाळायचे व स्वतःचे संरक्षण कसे करावे हे सांगितले होते. शालेय संघटनांचे प्रवक्ते दीपक राजगुरू यांनी सांगितले, पोलिसांच्या अभियानात आम्ही त्यांच्यासोबत असून, सर्व शाळांना  सहभागी होण्याचे आवाहन करू.
 

मुला-मुलींच्या भविष्यावर होतो परिणाम


आम्ही १० डिसेंबरपासून ही मोहीम सुरू करू. यात २ लाखांहून अधिक मुलींना माहिती देण्यात येणार आहे. शाळांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. शाळा, संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे मान्य केले आहे. मुले समजूतदार नसल्यामुळे लहान वयातच पळून जाण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो. कायद्यानुसार मुलावर कारवाई केली जाते. मुलीचे संपूर्ण भविष्य बिघडते आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये मुलींवर महिला सुधारगृहात राहण्याची वेळ येते -विधी चौधरी, डीसीपीबातम्या आणखी आहेत...