Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Policeman beaten in nagar; two arrested

नगरमध्‍ये पोलिसाला मारहाण; दोघांना अटक

प्रतिनिधी | Update - Sep 02, 2018, 12:09 PM IST

गर्दीत गाडी का घातली असे विचारल्याचा राग आल्याने दोघांनी पोलिसाला शिवीगाळ करत लाथा -बुक्क्यांनी मारहाण केली.

  • Policeman beaten in nagar; two arrested
    श्रीगोंदे - गर्दीत गाडी का घातली असे विचारल्याचा राग आल्याने दोघांनी पोलिसाला शिवीगाळ करत लाथा -बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना तालुक्यातील काष्टी येथे घडली.

    काष्टी येथे पोलिस कॉन्स्टेबल प्रताप तानाजी देवकाते व के. पी. घोळवे हे श्रीगोंदे चौकात वाहतूक सुरळीत करत असताना ओमिनी (एमएच-१२ बीपी-१६७) ही गर्दीत घुसली. तिच्यामुळे वाहनांची गर्दी वाढली. गाडी गर्दीत का घातली अशी विचारणा देवकाते यांनी ओमिनी चालकाला केली. याचा राग येऊन ओमिनीत बसलेला एक जण व चालक या दोघांनी देवकाते यांना शिवीगाळ करत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी देवकाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक चंपालाल लक्ष्मण घोडके (३८, सिद्धार्थनगर, श्रीगोंदे) व मयूर नीलकंठ गजरमल (१९, काष्टी, ता. श्रीगोंदे) यांच्याविरोधात दाखल करण्यात आला. या दोघांना पोलिसांनी अटक केली.

Trending