आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसच्या मागे तृतीयपंथीयाला घेऊन गेला पोलिस शिपाई, करू लागला हे काम, मग तरुणांच्या टोळक्याने पकडले रंगेहाथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या थोरइपक्‍कम पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका शिपायाचे तडकाफडकी ट्रान्सफर करण्यात आले आहे. या शिपायाला तरुणांच्या घोळक्याने शनिवारी रात्री पल्‍लीकरनाई परिसरात एका बसमागे तृतीयपंथीयासोबत सेक्स करताना रंगेहाथ पकडले होते. या तरुणांनी शिपायला विरोध करून या घटनेचा व्हिडिओही बनवला होता.


स्‍थानिकांनी पोलिस शिपाई सतीश सत्‍यराजला विरोध केला आणि त्याच्या वाहनाचेही नुकसान केले. पोलिस सूत्रांनुसार, स्थानिक अनेक दिवसांपासून तक्रार करत होते की, काही किन्नर पल्‍लीवरम रेडिअल रोडवर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना त्रास देतात, त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. अनेकदा तक्रारकरून ही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नव्हती.

स्थानिकांचा दावा आहे की, या परिसरात लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

 

पल्‍लीकरनाईमध्ये राहणारे चंद्रशेखर म्हणाले, 'आम्ही हा मुद्दा पोलिसांसमोरही उचलला होता. परंतु ते लाच घेतात आणि याकडे दुर्लक्ष करतात. दोषींसोबत तेही मिसळलेले आहेत, याच आम्हाला दाट संशय आहे.' शनिवारी रात्री काही तरुणांनी पाहिले की, पोलिस कर्मचारी किन्नरांसोबत बोलत उभा होता.

 

यानंतर त्यांनी कथितरीत्या एका किन्नराला बसच्या मागे नेले. तरुणांनी या पूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ बनवला. पोलिसांनी तरुणांना विनंती केली की, कृपा करून हा व्हिडिओ डिलीट करा. जेव्हा स्‍थानिकांनी त्यांच्या वाहनाची मोडतोड सुरू केली तेव्हा हा वर्दीधारी पोलिस तेथून पळून गेला. 

 

एवढेच नाही, काही किन्‍नरही पोलिस शिपायाच्या समर्थनार्थ उतरले आणि व्हिडिओ शूट करण्यापासून रोखू लागले. यानंतर तरुणांनी या पोलिस शिपायाला पल्‍लीकरनाई ठाण्यात नेले. सतीशचे तडकाफडकी ट्रान्सफर करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी बसवण्यात आली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...