आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : पत्नीच्या उपचारासाठी सुटी न मिळाल्याने पोलिसाची आत्महत्येची तयारी, 1 वर्षात फक्त 3 दिवस मिळाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महोबा - उत्तर प्रदेशच्या महोबा येथील एका पोलिसाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात पोलिस कर्मचारी सुटी न मिळाल्याने आत्महत्या करण्याची धमकी देताना दिसतोय. व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण महोबा पोलिस लाइनमध्ये तैनात असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे नाव लक्ष्मण असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये लक्ष्मण रडून रडून त्याच्या पत्नीची तब्येत खराब असल्याचे सांगताना दिसतोय.


बायकोला पॅरालिसिस झाला असून त्याला GPF ही मिळाला नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. लक्ष्मणला गेल्या 1 वर्षात फक्त 3 दिवस सुट्या मिळाल्या आहेत. पत्नीच्या उपचारासाठी त्याला पैशांचीही गरज आहे. व्हिडिओमध्ये लक्ष्मणने म्हटले की, GPF काढण्यासाठी त्याने अर्ज केला होता, पण त्याला पैसे मिळाले नाही आणि विभागाने सुटीही दिली नाही. 


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहत लक्ष्मणला 45 दिवसांची सुटी आणि GPF मधून 1 लाख रुपयेही दिले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...