Home | Business | Business Special | Policy for women entrepreneurs; PM Modi's gift for women 

महिला उद्योजकांसाठी धोरण; निवडणुकीआधी मोदींची उद्योजक महिलांना मोठी भेट 

वृत्तसंस्था | Update - Jan 12, 2019, 09:40 AM IST

सरकारने अलीकडेच लघु उद्योजकांना मदत करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

  • Policy for women entrepreneurs; PM Modi's gift for women 

    नवी दिल्ली- सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी महिला उद्योजकांना मोदी सरकार एक मोठी भेट देण्याची शक्यता आहे. महिला उद्योजकांसाठी सरकार स्वतंत्र धोरण तयार करत आहे. या उद्योजकांनी घेतलेल्या कर्जावर जास्त सबसिडी दिली जाईल. छोट्या उद्योगाकडून सरकार खरेदी करत असलेल्या खरेदीमध्ये महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र वाटा निश्चित होण्याची शक्यता आहे. सध्या सरकारी विभागात होणाऱ्या एकूण खरेदीपैकी २० टक्के खरेदी लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांकडून करण्याचा नियम करण्यात आला आहे.

    सरकारने अलीकडेच लघु उद्योजकांना मदत करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. गुरुवारीच वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने जीएसटी नोंदणी करण्यासाठीची मर्यादा २० लाखांवरून वाढवून ४० लाख करण्याचा निर्णय घेतला होता. याव्यतिरिक्त कंपोझिशन व्यापाऱ्यांना तिमाहीऐवजी वार्षिक परतावा भरण्याची सवलत देण्यात आली होती. वार्षिक १.५ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्यांना अकाउंटिंग आणि बिलिंग सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लघु सेवा प्रदात्यांना दिलासा देत ५० रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्यांना कंपोझिशनचा पर्याय निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी ५९ मिनिटांत कर्ज मंजूर करण्याची घोषणा केली होती. याव्यतिरिक्त कामगार आणि पर्यावरणसंबंधित नियमात सवलत देण्यात आली होती.

    स्वस्तात कर्ज उपलब्ध करणार
    लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांचा व्यवसाय अपग्रेड करण्यासाठी कॉम्प्युटरायझेशन करण्याची इच्छा असेल तर सरकार त्यांना कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून देऊ शकते. याचीही घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे.

Trending