आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Political Dispute In The Wrestling Trap Of Malegaon. Fight Among Supporters Of MP Chikhlikar And MLA Shinde

कुस्तीच्या फडात राजकीय दंगल, उद्घाटनावरून खा. चिखलीकर आणि आमदार शिंदे यांच्या समर्थकांत धक्काबुक्की

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नांदेड : विधान सभा निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार श्यामसुंदर शिंदे या मेव्हण्यांत झालेल्या राजकीय मतभेदाचे पडसाद गुरुवारी माळेगाव यात्रेतील कुस्त्यांच्या दंगलीत उमटले. कुस्त्यांच्या दंगलीचे उद्धघाटनावरून आमदार शिंदे व चिखलीकर समर्थकांत धक्काबुक्की झाली.

माळेगाव यात्रेत गुरुवारी सकाळी कुस्त्यांच्या दंगलीचे उद््घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते होणार होते. माळेगाव हे लोहा मतदार संघात असून त्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे आहे. त्यानुसार उद्घाटक म्हणून त्यांचे नाव होते. परंतु खा.चिखलीकर समर्थकांनी या दंगलीचे उद्घाटन खासदारांच्याच हस्ते झाले पाहिजे, असा आग्रह धरला. त्यामुळे वातावरण तापले. यात शिंदे आणि चिखलीकर समर्थकांत वादावादीही झाली. रागाच्या भरात आ. शिंदे चिखलीकर समर्थकांच्या अंगावर धावून गेले. परंतु पोलिसांनी त्यांना अडवले. या तापलेल्या वातावरणामुळे अखेर खा. चिखलीकर कुस्त्यांच्या दंगलीचे नारळ फोडून निघून गेले.
 

बातम्या आणखी आहेत...