आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप आणि अजित पवारांना बहुमत चाचणीची चिंता नाही, मात्र तिन्ही विरोधी पक्षांना आमदार फुटण्याची भीती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी सकाळी शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. - फाईल फोटो - Divya Marathi
शनिवारी सकाळी शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. - फाईल फोटो

मुंबई - महाराष्ट्रात शुक्रवारी आणि शनिवारी चांगले राजकीय नाट्य घडले. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना एकत्र केले आहे. आपले आमदार फुटू नये यासाठी त्यांना हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले आहे. आमदाराने आपले मत बदलू नये यासाठी पक्षातील उच्च नेतृत्व त्यांच्या संपर्कात आहेत. तर दूसरीकडे भाजपने आपल्या आमदारांवर कोणत्याही प्रकारची बंदी घातली नाही. भाजपच्या एका आमदाराने तर चक्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. तर इतर आमदार राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधताना दिसून आले. भाजपला बहुमत चाचणीच्या स्थितीत 170 आमदारांचे समर्थन मिळवण्याचा विश्वास आहे. दरम्यान अजित पवार उघडपणे बाहेर येत नाहीत. परंतु तांत्रिक बाबींमुळे बहुमत चाचणीवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांवर अजित पवारांचा व्हिप मानला जाईल असा त्यांच्या गटाला विश्वास आहे. 

भाजपने शरद पवारांकडे समर्थन मागितले?


भाजपचे संजय काकडे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या दरम्यान भाजपने शरद पवारांकडे समर्थन मागितल्याचे बोलले जात आहे. मात्र दोन्ही नेत्यांकडून याची पुष्टी करण्यात आली नाही. भाजपकडे अजित पवारांचे पत्र 


शनिवारी सकाळी शपथविधीला अजित पवारांसोबत उपस्थित असलेले आमदार संध्याकाळी शरद पवारांकडे परतले. परंतु यानंतरही आम्ही बहुमत चाचणीत जवळपास 170 आमदार एकत्र करून राज्यातील सरकार सहजरित्या वाजवू शकतो असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. अजित पवारांनी आम्हाला 54 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिले होते. ते पत्र आमच्याकडेच आहे. हेच पत्र बहुमत चाचणी आणि व्हिपचा मूळ आधार असेल. दरम्यान शिवसेनेला ज्या अपक्ष आमदारांनी समर्थन दिले होते ते देखील आमच्याकडे येऊ शकतात. यामुळे आता आम्हाला काळजी करण्याचे कारण नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. 

अजित पवारांच्या गटाला विश्वास, त्यांचेच व्हिप ग्राह्य धरणार


अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्याऐवजी जयंत पाटील यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. परंतु व्हिप बजावण्याचा अधिकार अजित पवार यांच्याकडेच राहील असा विश्वास बंडखोर गटाला आहे. याचे कारण म्हणजे, अजित पवार यांना पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत गटनेता निवडण्यात आले होते. या निवडीचे पत्र राज्यपाल आणि विधानभवनात यापूर्वीच पोहोचले आहे. यामुळे बहुमत चाचणीवेळी विधानसभा अध्यक्ष अजित पवार यांचेच व्हिप ग्राह्य धरतील. अजित पवारांच्या गटाचे म्हणणे आहे की, जयंत पाटलांची नियुक्ती तांत्रिक दृष्ट्या मान्य होणार नाही. कारण राष्ट्रवादी विधीमंडळ गटनेता निवडण्यासाठी बोलावण्यात आलेली बैठक तत्कालीन नेते अजित पवारांनी नाही तर पक्षाध्यक्षांनी बोलावली होती. अजित पवारांची त्या बैठकीतील अनुपस्थिती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान अशा तांत्रिक मुद्याला कसे सामोरे जावे याबद्दल शरद पवारांच्या गटात चर्चा सुरु आहे.


शिवसेना नेत्यांची राष्ट्रवादीच्या आमदारांवर न
जर


शरद पवारांनी आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेनेचे नेतेही येथे उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांवर रात्रभर नजर ठेवली. तर शिवसेने देखील आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवले आहे. दरम्यान आपले आमदार फुटावेत अशी काँग्रेसची देखील इच्छा नाही. शरद पवार यांनी सकाळी हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.