Political / कर्नाटकावरून बंगळुरू, दिल्ली, मुंबईत रंगले राजकीय नाट्य; आणखी दोघांचे राजीनामे, गोव्यात काँग्रेसला खिंडार

गोवा : काँग्रेसचे १० आमदार भाजपत, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी?

दिव्य मराठी नेटवर्क

Jul 11,2019 08:05:00 AM IST

बंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई - क‌र्नाटकातील राजकीय नाट्य बुधवारी बंगळुरूसह नवी दिल्ली आणि मुंबईतही तापले. काँग्रेसचे एक मंत्री आणि दुसऱ्या एका आमदाराने राजीनामा दिल्याचे घोषित केल्याने राज्यातील काँग्रेस-जेडीएस सरकारच्या अडचणी अधिक वाढल्या. या राजीनाम्यांमुळे बंडखोर आमदारांची संख्या आता १४ वरून १६ झाली आहे. अध्यक्ष रमेश कुमार यांनी एकही राजीनामा मंजूर केलेला नाही. दरम्यान, गोव्यातही काँग्रेसचे १० आमदार भाजपात दाखल झाले.

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी?
> बंडखोर १० आमदारांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता.
> बंडखोरांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले कर्नाटकातील मंत्री डी.के. शिवकुमार यांना पोलिसांनी जमावबंदीचे उल्लंघन केल्यावरून ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या वेळी मिलिंद देवरा सोबत होते.
> आणखी दोन आमदार - टी. सुधाकर आणि मंत्री एम. नागराज यांचे राजीनामे.


गोवा : काँग्रेसचे १० आमदार भाजपत
बुधवारी रात्री गोव्यात काँग्रेसला खिंडार पडले. १५ पैकी १० आमदार भाजपमध्ये सामील झाले. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा गट फुटला. यामुळे गोवा विधानसभेत आता भाजप आमदारांची संख्या आता २७ झाली.

X
COMMENT