आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवा असल्याचा देखावा करते शिवसेना, सत्तेसाठी काँग्रेसच्या रंगात रंगलीय - नितीन गडकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेने सत्तेसाठी आपल्या विचारधारेशी केली तडजोड

नागपूर - शिवसेना भगवा असल्याचा देखावा करते, परंतु प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. शिवसेनाने मुख्यमंत्री पदासाठी आपल्या विचारधारेसोबत तडजोड केली आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसोबत मिळून शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आले असल्याचेही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. 
नितीन गडकरींचे हे विधान नेमके अशावेळी समोर आले ज्यावेळी वीर सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेना समोरासमोर आले आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशात आपल्या कार्यकर्त्यांना एका पुस्तकाचे वाटप केले. ज्यात वीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर एक महान व्यक्ती होते, आणि नेहमी राहतील. एक गट नेहमीच सावरकरांबाबत चुकीचे बोलत असतो. यावरून त्यांचे विचार किती गलिच्छ आहेत हे समजते. 
गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र कमी जागा जिंकूनही शिवसेनेने भाजपकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. यावर भाजपने नकार दिला होता. यानंतर शिवसेना आणि भाजप युती संपुष्टात आली. त्यांतर शिवसेनाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. बातम्या आणखी आहेत...