आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Politician Charged With Heinous Crimes May Be Barred From Polls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता निर्णय पंतप्रधानांनी घ्यावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप झालेल्या मंत्र्यांना अपात्र ठरवण्यास नकार देतानाच या प्रश्नाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला आहे. शिवाय कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या विरोधात गुन्हेगारीचे आरोप निश्चित झाले असल्यास त्याला मंत्रिपद दिले जाऊ नये, असे मत नोंदवताना अशा लोकप्रतिनिधींना मंत्रिपद द्यायचे किंवा नाही याचा निर्णय पंतप्रधानांनी आणि त्या-त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असे सरन्यायाधीशांनी सांगितले हे योग्यच आहे . शक्यतो मंत्रिमंडळात गुन्हेगारी व विविध आरोप असलेल्या लोकप्रतिनिधींचा समावेश करू नये. राज्यघटनेचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर खूप विश्वास आहे. त्यांनी जबाबदारीने काम करावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गुन्हे दाखल असलेले १३ मंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.