Home | National | Other State | politician speech speed analysis in Rajasthan election

मोदी विरोधी पक्षाविरुद्ध एका मिनीटात बोलले 200 शब्द, राम मंदिरावर बोलताना योगी यांची स्पीड होती 175, तर राहुल यांचा वेग 140 शब्द; जाणून घ्या बोलण्याच्या शर्यतीत कोणता नेता कोठे आहे?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 07:18 PM IST

भाषण देण्याच्या बाबतीत पंतप्रधान मोदी आहेत बुलेट ट्रेन

 • politician speech speed analysis in Rajasthan election

  उदयपूर/जयपूर - निवडणुक लढविण्याचे सर्वात परिणामकारक आणि धारदार शस्त्र म्हणजे जीभ. निवडणुक काळात मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. मग ते पंतप्रधान मोदी असो, योगी असो, गहलोत असो, पायलट असो किंवा राहुल गांधी. बोलण्याच्या वेगाविषयी सांगायचे झाले तर पंतप्रधान मोदी एका मिनीटात 180 ते 200 शब्दांची उधळन करत सर्वात पुढे आहे. तर राहुल गांधी सगळ्यात मागे.


  'बुलेट ट्रेन' सारखा वेग

  > पंतप्रधान मोदी सामान्यतः ते भाषणामध्ये 96 ते 110 प्रति मिनीट बोलतात. पण विरोधी पक्षाविरुद्ध बोलताना त्यांचा वेग प्रति मिनीट 180 ते 200 शब्दांनी वाढतो.


  'राजधानी'ला टक्कर...
  > भाषणामध्ये राहुल गांधी दर मिनीटाला कमाल 140 शब्दांपर्यंत बोलतात. त्यांची बोलण्याची गती अशोक गहलोत आणि सचिन पायलट पेक्षाही कमी आहे.


  'तेजस' सारख्या गतिमान...

  > मुख्यमंत्री वसुंधरा राजे निवडणुकीच्या जनसभेमध्ये 1 मिनीटात 149 ते 168 शब्द बोलतात. तर राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना त्यांचा वेग 175 शब्द प्रति मिनीट होतो.

  'एक्सप्रेस' सारखी स्फुर्ती...
  > काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट प्रचार रॅली दरम्यान 1 मिनीटात 140 ते 165 शब्द बोलतात. प्रचारसभेत बोलण्याच्या बाबतीत ते गहलोत आणि राहुल यांच्याही पुढे आहेत.


  नॉन स्टाप 'सुपरफास्ट'...
  > मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभेमध्ये 1 मिनीटात 135 ते 150 शब्द बोलतात. राम मंदिरावर चर्चा करताना हा वेग 170 पर्यंत जाते.

  'मेल' सारखा तालमेळ...
  > माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत जनसभेमध्ये 1 मिनीटात 140 शब्द बोलतात. मेट्रो आणि रिफाइनरी विषयी बोलतात 165 शब्दांपर्यंत त्यांची गती वाढते.

Trending