आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Murder: नशेत तर्रर्र होऊन रात्री घरी आला सभापतीचा मुलगा, मग आईसोबत जे केले त्यामुळे तिने ओढणीनेच आवळला गळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवच्या हत्येप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. हत्येच्या आरोपात पोलिसांनी अभिजितची आई मीरा यादवला अटक केली आहे. सूत्रांनुसार, त्यांनी आपला गुन्हाही कबूल केला आहे.

अभिजित यादवची आई मीराने पोलिस चौकशीत कबूल केले की, त्यांनीच आपल्या मुलाची गळा आवळून हत्या केली. मीराने सांगितले की, अभिजित जेव्हा नशेत होता, तो त्यांच्याशी उद्धटपणे वागत होता आणि त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला.

 

मीरा यादवने सांगितले की, त्यांनी आपला बचाव करण्यासाठी अभिजीतला मारले. यानंतर आपल्या 'ओढणी'ने त्याचा गळा आवळला. मीरा यादवने पोलिसांना सांगितले की, अभिजीतला मारल्यानंतर त्यांनी आपली ओढणी जाळून टाकली. 

 

वास्तविक, अभिषेक यादवच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मीरा यादव यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तब्बल 9 तास मीरा यादव यांची चौकशी केली होती. या चौकशीत मीरा यादवने आपल्यावरील सर्व आरोप कबूल केले.


रमेश यादवची दुसरी पत्नी आहे मीरा
मीरा यादव विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांची दुसरी पत्नी आहे. पहिली पत्नी यूपीच्या एटामध्ये कुटुंबासोबत राहते. ज्या फ्लॅटमध्ये ही घटना झाली तो रमेश यादव यांचाच आहे. येथे मीरा यादव, अभिषेक यादव (मोठा मुलगा) आणि अभिजित यादव राहत होते. हत्येच्या वेळी फ्लॅटमध्ये आणखीही कोणी होते का, याचा पोलिस शोध घेत आहेत.

 

पोस्टमॉर्टममधून झाला होता खुलासा
या हत्येबाबत बोलताना एसपी ईस्ट सर्वेश मिश्रा म्हणाले की, आम्ही 21 ऑक्टोबर रोजी अभिजित यादव यांचा मृतदेह दारूल शफामधून ताब्यात घेतला. आधी तर या कुटुंबाने याला नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले. परंतु आम्हाला संशय आला. पोस्टमार्टमनंतर हे स्पष्ट झाले की, हा नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर गळा दाबून करण्यात आलेली हत्या होती.

 

मोठ्या भावाने नोंदवली होती तक्रार
याप्रकरणी अभिजितचा मोठा भाऊ अभिषेकनेच पोलिसांत तक्रार नोंदवली होती. अभिषेकनेच आपल्या आईविरुद्ध 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


आधी कुटुंबीयांनी दिला असा जबाब
जोपर्यंत हत्येची माहिती समोर आली नव्हती, तोपर्यंत कुटुंब याला नैसर्गिक मृत्यू असल्याचेच सांगत होते. कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, रविवारी सकाळी अभिजित आपल्या बेडवर मृतावस्थेत आढळला होता.

कुटुंबीयांचे म्हणणे होते की, अभिजित शनिवारी रात्री 11 वाजता घरी आला होता. तेव्हा त्याने छातीत दुखत असल्याची माहिती आईला दिली होती. आईने छातीला मालीश करून त्याला झोपवले. सकाळी खूप उशीर होऊनही अभिजीत उठला नाही, तेव्हा आई त्याला उठवायला पोहोचली. शरीराची कोणतीही हालचाल न होताना पाहून त्यांनी भावाला बोलावले. भावाने त्याची नाडी पाहिल्यावर कळले की, त्याचा मृत्यू झालेला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video 

 

बातम्या आणखी आहेत...