आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्रम्पला आणले तरी माझा विजय रोखू शकत नाही : धनंजय मुंडे
“भाजपने माझा धसका घेतलाय. मोदी आल्याशिवाय खैर नाही, असे त्यांना वाटतंय. मी भाजपच्या एका मोठ्या नेत्याला म्हणालो, मोदी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराला गेले होते. १७ रोजी बीडमध्ये मोदी येताहेत. १९ ला ट्रम्प जरी आणले तरी विजय कुणीही रोखू शकत नाही.
- धनंजय मुंडे, राष्ट्रवादी (परळीत)
‘काँग्रेसने अध्यक्ष केले तर पवार विलीनीकरण करतील : आठवले
‘काँग्रेसमध्ये विलय करायचा की नाही हे त्यांनी त्यांचे ठरवावे. मी पवारांना एक सल्ला दिला होता. वेगळा पक्ष चालवण्यापेक्षा तुम्ही सोनिया गांधींशी चर्चा करावी. त्या अध्यक्ष आहेत, तुम्ही कार्यकारी अध्यक्ष व्हावे. म्हणजे, काही दिवसांनी तुम्हालाच अध्यक्षपद मिळेल.
- रामदास आठवले, रिपाइं (मुलाखत)
आघाडीतून भाजपत पक्षांतर केलेले सर्व नेते चांगलेच : प्रकाश जावडेकर
‘एखादा पक्ष मूळ वाट विसरून विचित्र वागू लागतो, तेव्हाच त्या पक्षातील माणसे दुसऱ्या पक्षात येतात. भाजपमध्ये आले ते सारे नेते चांगले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीत एकाच कुटुंबातील व्यक्ती निर्णय घेतात. काँग्रेस जनतेच्या मनातून उतरली असून राष्ट्रवादीचे अवसान संपत चाललंय. ’
- प्रकाश जावडेकर, मंत्री (पुण्यात)
... जर ईव्हीएम ‘हॅक’ झाले नाही तर सत्ता ‘वंचित’चीच : प्रकाश आंबेडकर
हॅकिंग इंडस्ट्रीने निवडणुकीत हॅकिंग करणार नाही, असा शब्द दिला आहे. तरीसुद्धा ईव्हीएम हॅक झाल्यास महाराष्ट्राचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. लोकसभेत आम्ही ४० लाखांवर मते घेतली. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद बघता जर ईव्हीएम हॅक केले गेले नाही तर नक्कीच वंचित बहुजन आघाडी सत्तेत बसेल.
- प्रकाश आंबेडकर, वंचित (यवतमाळ)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.