आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरच्या श्वासापर्यंत राहणार राजकारणात : गणपतराव देशमुख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला -  महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय ९२ वर्षे) हे राजकीय संन्यास घेणार असल्याच्या वावड्या मंगळवारी उठल्या. मात्र, स्वत: गणपतराव देशमुख यांनी या बातम्यांचे खंडन केले. एका इंग्रजी वृत्तपत्रात त्या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे या चर्चेला ऊत अाला. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने देशमुखांशी संपर्क साधला असता, त्यांनी हसून या बातम्या चुकीच्या अाहेत, अशी प्रतिक्रिया दिली.

 
तब्बल अकरा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले, ५२ वर्षे आमदार म्हणून लोकसेवा करत गणपतराव महाराष्ट्राच्या राजकारणात ‘भीष्माचार्य’ म्हणून अाेळखले जातात. अफवांचे खंडन करताना ते म्हणाले, “मी कशाला घेऊ राजकीय संन्यास? घेणार तर नाहीच, पण अखेरच्या श्वासापर्यंत राजकारणात राहणार. राजकारणाच्या माध्यमातूनच मी लोकांची सेवा करत राहणार. लोकांनी एवढे उदंड प्रेम केले. आजही देतात, तर मग संन्यास कशाला घेऊ? अफवा पसरवणारे लोक असतात. त्यांना उत्तर दिलेच पाहिजे. राहिला मुद्दा मी निवडणूक लढवण्याचा. माझा पक्ष (शेकाप) येणाऱ्या विधानसभा निवडणुक लढवणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...