आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Politics, Leave India... Economic social Issues Are Failed In Politics Again, See Discussion And Direction Of Our Leaders ...

राजकारणा, भारताला तरी सोड... गोंधळाच्या राजकारणात आर्थिक-सामाजिक मुद्दे पुन्हा बाद, पाहा आपल्या नेत्यांच्या चर्चा आणि दिशा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी, गिरिराज सिंह आणि जी. नरसिंह राव - Divya Marathi
राहुल गांधी, गिरिराज सिंह आणि जी. नरसिंह राव

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था, कांद्याची भाववाढ, वाढते बलात्कार व नागरिकत्व कायद्यावरून हिंसाचारासारखी आव्हाने समोर असताना शनिवारी राजकीय पक्षांनी मात्र इतिहासावरून नवा वाद घातला. रेप इन इंडिया'च्या वक्तव्यावरून माफी मागावी या भाजपच्या मागणीवर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. माफी मागणार नाही.' रामलीला मैदानावर भारत बचाव सभेतून केलेल्या या टिप्पणीवरून भाजप व शिवसेनेने राहुल यांना घेरले.

महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने थेट इशारा दिला की, सावरकरांच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही. संजय राऊत म्हणाले, पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांचा आम्ही सन्मान करतो. तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका. ज्यांना कळायचे त्यांना कळले आहे.' भाजपनेही या मुद्द्यावर राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल यांना सावरकरांच्या नखाचीही सर येत नाही.

आघाडीतील सहकारी काँग्रेस-शिवसेनेत ५ दिवसांत दुसऱ्यांदा वाजले... 
 

भाजप म्हणतो - मेक इन इंडियाच्या धर्तीवर रेप इन इंडिया' या टिप्पणीवर राहुल गांधी यांनी माफी मागावी.
राहुल म्हणतात - मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मेलो तरी माफी मागणार नाही. काँग्रेसवाले घाबरत नाहीत.
संजय राऊत म्हणाले - नेहरू-गांधींसारखे सावरकरही देशासाठी समर्पित होते. त्यांच्या सन्मानाशी तडजोड नाही.
फडणवीस म्हणाले - राहुलनी स्वत:ला गांधी' समजण्याची चूक करू नये. गांधी नावाने कुणी गांधी' होत नाही.

सावरकरांपासून जिनांपर्यंत घसरले नेते...

काँग्रेसवाला कोणाला भीत नाही...
सत्यासाठी माफी मागणार नाही. माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. देश उद‌्ध्वस्त केल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी माफी मागावी. ते देशाचे विभाजन करताहेत.' राहुल गांधी

उधार आडनावात देशभक्ती नसते... 
उधारीत आडनाव घेतल्याने कुणी देशभक्त होत नाही, देशभक्त होण्यासाठी शुद्ध भारतीय रक्त असावे लागते. ' गिरिराज सिंह, भाजप खासदार

तुम्ही सावरकर नव्हे, राहुल जिना...
तुमचे खरे नाव राहुल जिना आहे.मुस्लिमांचा कैवार तुम्हाला सावरकर नव्हे, जिनांचे योग्य वारसदार बनवतो. जी. नरसिंह राव, भाजप प्रवक्ते

भारत बचाव सभेत मोदी-शहांवर काँग्रेसचे टीकास्त्र... 

देशात अंधेर नगरी चौपट राजा : सोनिया

रामलीला मैदानात आयोजित भारत बचाव सभेत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, देशात सध्या अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती आहे. कधीही कायदा रद्द करा आणि लागू करा. माेदी-शहा यांनी घटनेची खिल्ली उडवली आहे. तर, राहुल म्हणाले, देशात अर्थव्यवस्था होती, ती आता नष्ट झाली आहे. आपल्या देशाचे वैरी अर्थव्यवस्थेला उद॰ध्वस्त करू पाहताहेत. हे काम शत्रूंनी नव्हे तर पंतप्रधानांनी केले.

भाजप आहे तर बेरोजगारी शक्य : प्रियंका

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी 'मोदी है तो मुमकिन है' या भाजपच्या घोषणेवरून कोटी करत म्हटले की, भाजप आहे तर १०० रुपये किलो कांदा शक्य आहे. भाजप आहे तर बेरोजगारीचा ४५ वर्षांचा उच्चांक शक्य आहे. चार कोटी नोकऱ्या जाणे शक्य आहे. उन्नाव पीडितेचा उल्लेख करत प्रियंका म्हणाल्या, त्यांच्या पित्याला रडताना पाहून मला माझ्या वडिलांची आठवण आली.

बातम्या आणखी आहेत...