Home | National | Other State | Politics on Indian Army Now after calling for votes on Air Strike, Modi's new innings

सैन्यावर राजकारण... एअर स्ट्राइकवर मते मागितल्यानंतर आता मोदींचा नवा डाव; लष्कराचे गुणगान का नको?

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 14, 2019, 09:53 AM IST

वन रँक-वन पेन्शन दिली आहे, मग लष्कराचे गुणगान का नको? : मोदी

 • Politics on Indian Army Now after calling for votes on Air Strike, Modi's new innings

  बंगळुरू - निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पाच दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी दोन-दोन सभा घेतल्या. तीन दिवसांआधी महाराष्ट्रात एअर स्ट्राइक आणि पुलवामाच्या शहिदांच्या नावांवर मते मागितल्यानंतर आता मोदी यांनी नवीन डाव टाकला आहे. त्यांनी लष्कराच्या नावावर मते तर मागितली नाहीत, पण काँग्रेसला उत्तर देताना म्हटले की, ‘काँग्रेस आज-काल म्हणत आहे की, मोदींनी लष्कराचे नाव घेऊ नये. पण लष्कराला वन रँक-वन पेन्शन दिले आहे, मग लष्कराचे गुणगान करायला हवे की नको? राष्ट्रीय युद्धस्मारक बनवले तर मग गुणगान करावे की नाही?’ तत्पूर्वी, लष्कराच्या नावावर मते मागितल्याबद्दल निवडणूक आयोगाने अहवाल मागवला होता.

  दक्षिण स्वारी: मोदींच्या तामिळनाडू-कर्नाटकात ४, राहुल यांच्या कर्नाटकात ३ सभा

  कारण, दुसऱ्या टप्प्यातील ९७ जागांपैकी ५३ जागा कर्नाटक व तामिळनाडूत...

  अर्थमंत्र्यांच्या (चिदंबरम) मुलाने देशाला लुटले - मोदी

  वडील(पी. चिदंबरम) अर्थमंत्री झाले व मुलाने देश लुटला. काँग्रेस, जेडीएस व त्यांच्यासारखे अनेक पक्ष कुटुंबातील शेवटच्या सदस्यास सत्तेचा लाभ देतात. आम्ही समाजाच्या शेवटच्या रांगेत उभ्या व्यक्तीस पुढे आणतो. ’ - नरेंद्र मोदी

  सर्व चोरांची नावे मोदीच का असतात?

  चौकीदार १०० टक्के चोर आहे. माझा एक प्रश्न आहे. सर्व चोरांची नावे मोदीच का असतात? मग ते नीरव मोदी असो की ललित मोदी की नरेंद्र मोदी? असे किती मोदी समोर येतील हे आम्हाला माहीत नाही. त्यांची पूर्ण टोळी आहे’ - राहुल गांधी

  दक्षिणेचे राजकारण - मोदी, राहुल सहकारी पक्षांसाठीही करत आहेत प्रचार

  तामिळनाडू: संपुआ आणि रालोआत लढत

  > येथे ३९ जागा आहेत. लढत यूपीए आणि एनडीए यांच्यात आहे. संपुआमध्ये ९ आणि रालोआमध्ये ८ पक्ष आहेत.
  > रालोआतून अण्णाद्रमुक २०, भाजप ५ आणि पीएमके ७ जागांवर लढत आहे. ७ ठिकाणी इतर सहकारी पक्ष आहेत.
  > संपुआत काँग्रेस ९ आणि द्रमुक २० जागांवर निवडणूक लढत आहे. १० जागा इतर सहकारी पक्षांना सोडल्या आहेत.
  > अण्णाद्रमुक आणि द्रमुक हे पक्ष आपल्या उमेदवारांसाठी मोदी आणि राहुल यांच्या सभांचीही मदत घेत आहेत.

  कर्नाटक: १४ जागांसाठी ५-५ सभा

  > राज्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १८ एप्रिलला १४ जागांवर मतदान होणार आहे.
  > या जागा दक्षिण कर्नाटकमध्ये येतात. हा भाग काँग्रेस-जेडीएसचा विधानसभा निवडणुकीचा बालेकिल्ला राहिला आहे.
  > राज्यात एकूण २८ जागा आहेत. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत १४ जागांसाठी ५-५ सभा घेतल्या आहेत.
  > भाजपने घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला तर जेडीएस-काँग्रेसने मोदी सरकारच्या कामकाजाला मुद्दा बनवले आहे.

  दुसऱ्या टप्पात यूपीच्या ८ जागा
  निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील आग्रा, फतेहपूर सिक्री, मथुरा, अलिगड, हाथरस, अमरोहा, बुलंदशहर आणि नगिना या मतदारसंघांत मतदान होईल. २०१४ मध्ये भाजपने या सर्व जागा जिंकल्या होत्या. तेथे हिंदुत्व ध्रुवीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

Trending