आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंंदू मते कशी मिळाली? मतांचे ध्रुवीकरण करणारी वक्तव्ये, १४३ पैकी ८६ जागांवर भाजपला फायदा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे निवडणुकीच्या निकालास धर्म व जातीच्या आधारे माहिती करून घ्या. आधी वाचा वेगवेगळ्या धर्मातील मतदारांची आकडेवारी.त्याचबरोबर ध्रुवीकरण व जातीय गणिते. 

 

> मोदींनी वर्ध्यात एक एप्रिल रोजी म्हटले, ‘त्यांनी हिंदूंना दहशतवादाशी जोडले. जेथे हिंदू जास्त आहेत तेथे ते लढत नाहीत’ 

कारण काय : राहुल गांधी मुस्लिम, ख्रिश्चनबहुल वायनाड येथून निवडणुकीस उभे राहिले. मोदींनी वर्ध्यात हे वक्तव्य केले.

परिणाम: महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती ४८ पैकी ४१ जागी आघाडीवर राहिली. राहुल वायनाडमध्ये ८लाख मतांनी जिंकले

 

> राहुल यांनी ३ एप्रिल रोजी आसाममध्ये म्हटले, ‘भाजप आला तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संपुष्टात आणेल. संघाचे विचार लादतील.’ 

कारण काय : राज्यात २५ टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मते आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त आसामी भाषिकांची मते ध्यानात घेऊन भाजपवर निशाणा साधला.
 

परिणाम : भाजपने १४ पैकी ८ जागा जिंकल्या तरी काँग्रेसने येथे ३ जागा जिंकल्या. यापैकी बारपेटा जागेत ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत.

 

> राहुल गांधी  १२ एप्रिल रोजी रात्री ११.१५ वाजता शिखांचे सर्वोच्च धर्मस्थळ सुवर्ण मंदिरात पोहोचले. दरवाजावर नतमस्तक झाले.

कारण काय - राहुल जलियनवाला बाग हत्याकांडाच्या स्मृतिदिनी पोहोचले. शीख मते मिळतील असे वाटले. पंजाबमधील १३ जागा शीखबहुल आहेत.

परिणाम  - राहुल येथे यशस्वी ठरले. पंजाबच्या १३ जागांपैकी काँग्रसने ८ जागा जिंकल्या.  येथे भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.

 

> ९ एप्रिल रोजी मेरठ येथे योगींनी म्हटले, सपा-बसपा-काँग्रेसचा अलीवर विश्वास असेल तर आमचा विश्वास बजरंगबलीवर आहे.

कारण काय : मायवतींना उत्तर देण्यासाठी तसेच पहिल्या ते तिसऱ्या टप्प्यातील २६ जागांच्या मतविभाजनासाठी हे वक्तव्य केले.
परिणाम : भाजपला फायदा झाला. २६ पैकी १७ जागा जिंकण्यात भाजप यशस्वी ठरला. महायुतीला ८ जागा मिळाल्या. 

 

> प. बंगालमध्ये ६ मे रोजी मोदींनी म्हटले, दीदी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवत आहेत.  अमित शहांनीही जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

कारण काय : २७ टक्के मुस्लिम लोकसंख्येच्या बंगालमध्ये हिंदू मते एका बाजूला वळवण्यासाठी हे वक्तव्य केले.
परिणाम : हिंदू व हिंदी भाषिक मते भाजपकडे वळली. प्रथमच भाजपला येथे दोन आकडी जागांची संख्या गाठता आली.