आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव्या अंतिम टप्प्यात ५९ जागांवर आज मतदान, वाराणसीकडे लक्ष; तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील मतदान रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अंतिम टप्प्यात रविवारी ७ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५९ जागांवर मतदान होत आहे. २०१४ मध्ये एनडीएकडे यातील ४१ म्हणजे ६९ टक्के जागा होत्या. काँग्रेसला पंजाबमध्ये केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. इतर पक्षांकडे १८ जागा होत्या.


या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३ जागा, उत्तर प्रदेशातील १३, प. बंगालमधील ९, बिहार व मध्य प्रदेशातील प्रत्येकी ८, हिमाचलमधील ४, झारखंडमधील ३ तर केंद्रशासित प्रदेश चंदिगडमधील एका जागेसाठी मतदान होत आहे. या टप्प्यातील मतदानासोबतच २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील ५४३ जागांपैकी ५४२ जागांसाठी मतदान पूर्ण होईल. २३ तारखेला मतमोजणी होत आहे. तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात पैसे वाटल्याचे प्रकरण समोर आल्यावर तेथील मतदान रद्द करण्यात आले आहे. 


वाराणसीकडे लक्ष :

या टप्प्यात नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात तसेच देशातील सर्वात उंच मतदान केंद्र असलेल्या हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती जिल्ह्यात टशीगंगमध्ये मतदान होत आहे. मंडी मतदारसंघातील हे एक केंद्र आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...