आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयातीत स्मशान वैराग्य आणि घनदाट स्मॉगची देशी हकिकत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अनुज खरे 

परदेशात गेलो. सात दिवसांतच बेचैन वाटू लागले. रक्तदाब वाढला. जीव घाबरा झाला. कशामुळे..? काय ती तिथली साफ-सफाई, सगळीकडं शिस्त अन् कडक कायदा- सुव्यवस्था. लोकांची देशभक्ती पाहून डोळे भरुन आले. असो. आपण अस्वस्थतेवर बोलत होतो. त्या ठिकाणची स्वच्छता पाहून भीती वाटू लागली. तिथला एक जण डस्टबिनजवळ उभा होता. त्याला विचारलं, 'काय झालं, मित्रा?' त्यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून आपल्या देशातल्या एखाद्याने रॉकेल टाकून डस्टबिन जाळून टाकलं असतं! त्याने सांगितलं, की त्याचा मित्र केळी घेऊन येतोय, त्याची सालं डस्टबिनमध्ये टाकता यावी म्हणून तिथं थांबलोय. किती रिकामटेकडा..!

एका भल्या सकाळी रस्त्यावरचे सगळे लोक गटार साफ करताना दिसले. सगळी गल्ली एकजूट होऊन करीत असलेला हा गलिच्छपणा बघून पुन्हा बेचैन वाटू लागले. अरे, आमच्याकडच्या बजबजलेल्या गटारींची बातच वेगळी! पन्नास- पन्नास कोसांपर्यंत सुगंध पसरवणारे ते शानदार नाले- गटारी या विदेशी लोकांनी कुठं बघितलेत? त्यामागे आमच्या नैसर्गिक वारशावरचं प्रेमच आहे. आम्ही अनेक वर्षांच्या मेहनतीतून या नाल्या-गटारांतून इतिहास- पुरातत्वाचे कितीतरी थर जमा केले आहेत. शतकानंतर कधी खोदकाम झालं, तर त्यामधूनही एखादी लहान- मोठी संस्कृती बाहेर निघाल्यास आश्चर्य वाटायला नको. 'गटारगंगे'सारखी विकसित संस्कृती. एकदा तिथल्या एका बाजारातून फिरताना भिकाऱ्यासारखा दिसणारा एक माणूस रस्त्यावर हॅट ठेवून हातातल्या व्हायोलिनवर बोटं घासत उभा असल्याचं दिसलं. त्याचं वादन ऐकून लोक हॅटमध्ये पैसे टाकत होते. आपल्याकडे असे दृष्य गायन- वादनापेक्षा भिकारीपणासाठी केल्याचे दिसले असते. आम्ही देशाविषयी गर्वाने बोलत नाही, कारण आमच्याकडे घमेंडी लोक नाहीतच. इतर लोक आमच्या देशाबद्दल काय विचार करतील, म्हणून सगळ्या चांगल्या गोष्टी आम्ही पुस्तकातच ठेवल्या आहेत. लोकांना विचाराल, तर ते बिचारे साधे-भोळे आहेत. त्यांच्यात घमेंड अजिबात नाही. संकोचामुळे देशाबद्दल काय चांगलं सांगतील? जास्तच मागे लागलात, तर तुमचा मान ठेवण्यासाठी इथल्या वाईट गोष्टींत आणखी भर घालतील. इतका साधेपणा कुठे पाहायला मिळतो?

खरे तर, माझ्याप्रमाणे परदेशातून मायदेशी परतणाऱ्या प्रत्येकाला अशाच प्रकारच्या आयातीत स्मशान वैराग्याची अनुभूती येत असेल. मग देशी वास्तव समोर येताच सारे प्रकरण दिल्लीच्या स्मॉगमध्ये रुपांतरित होते. म्हणजे मोठ्यात मोठी समस्या अंगावर घेणे आणि तिला सवय बनवण्याची सहज प्रवृत्ती. याच प्रवृत्तीतून आम्ही असा विचार करतो की इतके सगळे लोक आहेत, त्यातील कुणी ना कुणी, कुठं ना कुठं स्वच्छता करत असेलच. देश थोडाच आमच्या भरवशावर आहे.

अनुज खरे फीचर हैड, दैनिक भास्कर

बातम्या आणखी आहेत...