आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत प्रदूषण आणीबाणी, शाळा बंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोकळ्या वातावरणात व्यायाम करू नका : सल्ला
  • एअर क्वालिटी इंडेक्स ४५९ वर

​​​​​​नवी दिल्ली : धूळ आणि धुराने वेढलेल्या दिल्लीतील प्रदूषण आता आणीबाणीच्या स्थितीत पोहोचले आहे. शुक्रवारी राजधानीत एअर क्वालिटी इंडेक्स ४५९ होता. अनेक भागात तो ५०० पर्यंत नोंदला गेला. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व शाळांना ५ नोव्हंेबरपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय हिवाळ्यात फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लोकांनी खुल्या वातावरणात व्यायाम करू नये असा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारी रात्री हे प्रदूषण आणीबाणीच्या स्थितीत होते. रात्री साडेबारा वाजता एक्यूआय ५८२ नोंदला गेला.


जागतिक बँकेनुसार जगातील १५ वर्षांखालील मुले प्रदूषित हवेत जगत अाहेत. त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असून यामुळे २०१६ मध्ये ६ लाख मुलांचा मृत्यू झाला होता. शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार, १८ वर्षांत उत्तर भारतातील पठारी प्रदेशांमध्ये देशांतील इतर भागांपेक्षा दुप्पट प्रदूषण आढळते. यादरम्यान प्रदूषण ७२ टक्क्यांनी वाढले आहे. देशातील ४० टक्के लोक विषायी हवेत जगत आहेत. यामुळे या लोकांचे आयुर्मान सात वर्षांपर्यंत कमी झाले आहे.


४६% प्रदूषण काड जाळल्यामुळे : शुक्रवारी दिल्लीत ४६ टक्के प्रदूषण पिकांचे काड जाळल्यामुळे होते. हे आजवरचे सर्वाधिक प्रदूषण आहे. देशात १८ वर्षांमध्ये प्रदूषण ७२% वाढले, विषारी हवेत जीवन

एमक्यूआय असतो असा
० ते ५० - चांगला
५१ ते १०० - समाधानकारक
१०१ ते २०० - मध्यम
२०१ ते ४०० - वाईट
३०१ ते ४०० - अत्यंत वाईट
४०१ ते ५०० - गंभीर
५००च्या वर - गंभीर,आणीबाणी


रस्त्यांवर मशीनने झाडलोट, पाण्याचे फवारे. सर्व स्टोन क्रशर प्रकल्प बंद करण्यात आले. 
कोळशावर चालणारे सर्व कारखाने केले बंद. ४ ते १५ नोव्हंे.पर्यंत वाहनांसाठी ऑड-इव्हन.
 

बातम्या आणखी आहेत...