आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत प्रदूषण! नव्हे, उत्तर भारतीय धुके म्हणा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेतन भगत 
गेल्या पाच वर्षांत 'दिल्ली प्रदूषण' हा शब्द भारतीयांच्या मनावर पक्का बिंबला अाहे. दिल्ली राज्यामध्ये याकडे एक मोठा राजकीय मुद्दा म्हणून पाहिले जाते, त्यास प्रसारमाध्यमांकडून प्रचंड कव्हरेज मिळते आणि अनेक बड्या नेत्यांचेही ताे लक्ष वेधून घेतो. आपली राष्ट्रीय राजधानी जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे यात काही शंका नाही. निर्देशांकांनीदेखील त्यांची उच्च पातळी ओलांडली आहे, आणि आता धोकादायक श्रेणीदेखील प्रदूषण निर्देशांकाने अाेलांडली अाहे. याशिवाय पीएम २.५ आणि एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स)ने निम्न पातळी गाठली अाहे. दिल्लीत मास्क घालून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचा फोटो हा एक गंभीर इशारा ठरावा. ज्या देशात आपण हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तानबद्दलच्या गाेष्टी सतत ऐकून कंटाळत नाही, तेथे वर्षभरातून एक आठवडाभर प्रदूषणाच्या केंद्रस्थानी येणे हे त्यामानाने चांगलेच म्हणावे, नाही का? तथापि, या समस्येचे आपण कसे वर्णन करावे आणि ते कसे ओळखावे ही बाब मुळात चिंताजनक अाहे. वर्षानुवर्षे असे होत असतानाही आम्हाला तोडगा न सापडण्यामागचे हे एक कारण असू शकते.


प्रदूषण हा सर्वोच्च प्राधान्याचा मुद्दा असायला हवा, (कारण, जर आपल्याला श्वास घेता येत नसेल तर बाकीच्या गोष्टींना काही अर्थ नाही, नाही का?) पण जेव्हा तोडगा निघतो तेव्हा आपण असमंजस आणि भावनिक बनतो. या समस्येला तोंड देण्यातील पहिली अडचण म्हणजे आपण त्यास केवळ दिल्लीचीच समस्याच म्हणत आहोत. आपल्यापैकी बरेच जण यासाठी दोषी ठरतात. अलिगड, सिरसा, हापुड़, मुरादाबाद किंवा बागपतची मुले काय करतात? आम्हाला असे वाटते की, या समस्येमध्ये गुरगाव आणि नोएडाचा समावेश करून आम्ही धर्मादाय स्वरूपाचे काम करीत आहोत? जिंद आणि कानपूरच्या प्रश्नावर असे म्हणतात की, भाऊ तू कोण आहेस? माध्यम, व्हीआयपी, प्रभावशाली लोक आणि बड्या राजकारण्यांच्या मोठ्या संख्येने दिल्ली सर्वाधिक महत्त्वाची ठरते. दिल्ली ही स्पष्टपणे विभागलेली राजकीय ताकद आहे, म्हणूनच ती इथली तत्काळ राजकीय समस्या बनते. हे भाजप विरुद्ध आप, ऑड-इव्हन वि. ऑड-इव्हन आणि 'मला तुमची अधिक काळजी आहे' यासारखे विषय समाेर येतात. हे आम्हाला कोठेही घेऊन जात नाहीत. त्याला दिल्लीचा मुद्दा म्हणणे थांबवा. हा एक उत्तर भारतीय मुद्दा आहे आणि उत्तर भारतात केवळ एकच राजकीय शक्ती नाही.


दुसरी समस्या अशी आहे की, जेव्हा आपण प्रदूषणामुळे अस्वस्थ होतो तेव्हाच फक्त काहीतरी करतो. संशाेधक आपल्याला सांगतील की, आपल्याकडे निळेशार आकाश आहे, तरीही हवेमध्ये प्रचंड प्रदूषण होऊ शकते. मी सांगू शकतो की, आम्ही यावर कधीच प्रतिक्रिया देणार नाही. लोकांसाठी सर्वाधिक त्रासदायक म्हणजे धूम्रपान, धुके आणि दाट धुके. असे वाटते की कणा-कणांतील प्रदूषण लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असावे, खरे तर विषदेखील पारदर्शक असू शकते. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात दरवर्षी दाटून येणाऱ्या दाट धुक्यांमुळे लोकांना त्रास होतो. म्हणूनच, हे अात्यंंतिक निकडीचे असल्याचे लक्षात घेऊन आपण त्याचे नाव बदलणे आवश्यक आहे. त्याला 'दिल्ली प्रदूषण' म्हणण्याऐवजी आपण त्याला 'उत्तर भारतीय धुके' म्हणायला हवे. तथापि, फक्त नाव बदलल्याने काही होणार नाही, परंतु जेव्हा आपण त्याचे निराकरण करण्यासाठी बसताे तेव्हा हेदेखील महत्त्वाचे ठरते. या परिभाषेनुसार उत्तर भारतीय धुके हा कोणत्याही एका राज्याचा राजकीय मुद्दा बनवता येणार नाही. याचा एकत्रित सामना करावा लागेल. जर आपण खरेच या धुक्याबद्दल बोलू शकलाे तरच त्याच्या मुळाशी म्हणजेच पिकांचे अवशेष (पाचट) जाळण्यापर्यंत पोहोचू शकतो.


दोन वर्षांपूर्वी, लोक यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते की शेतकऱ्यांनी पाचटाच्या पेंढ्या जाळल्याने दिल्लीत प्रदूषण होते. कारण, त्यांनी कधीही या विषयाकडे त्या अर्थाने पाहिलेच नाही. उत्तर भारतीय धुके असेच लाेक मानायचे. त्यासाठी दिल्लीतील काही बाबींवर ते अाक्षेप घेत राहिले. प्रथम कारखाने, कार आणि बांधकाम या घटकांना लक्ष्य केले गेले. या उपक्रमांमुळे प्रदूषण जरूर होते, परंतु खरा प्रश्न धुराचा होता आणि ताे पेंढ्या जाळल्यामुळे निर्माण हाेत असे. याव्यतिरिक्त दोन डझनाहून अधिक शहरांमध्ये ही समस्या उद्भवत आहे, हे तपासण्याचा विचार कोणीही केला नाही. किंबहुना ही समस्या वर्षाच्या एका विशिष्ट वेळी सुरू होते आणि दोन आठवड्यांत संपते. पण, यावर राजकारण सुरूच असते. जाेपर्यंत साेसाट्याच्या वारा हा विषय उडवून लावत नाही, ताेपर्यंत दरवर्षी हिवाळ्यात दिल्ली कुडकुडत राहायची. अाजचे चित्र यापेक्षा निराळे नाही.


ज्या देशातील पालक आपल्या मुलांना विज्ञान शिकवण्याची आणि त्यांना डॉक्टर, अभियंते बनवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात अशा देशात एवढ्या मोठ्या समस्येसाठी अशा प्रकारचा अवैज्ञानिक पुढाकार धडकी भरवणारा आहे. आपण मूळ समस्या जशी आहे तशी स्वीकारली पाहिजे आणि सर्व जबाबदार घटकांनी एकत्र बसून त्याचे निराकरण केले पाहिजे.


सिंगापूरमध्येही धुके हा एक मुद्दा आहे, जेथे इंडोनेशियन शेतकरी दरवर्षी वसंत ऋतूत आपली शेती स्वच्छ करण्यासाठी शेतात आग लावतात. जसे की उत्तर भारतात घडते, आणि काही आठवड्यांत ही समस्या संपते. आंतरराष्ट्रीय सीमेमुळे येथील समस्या अधिक गुंतागुंतीची बनते. मात्र सर्वप्रथम अाम्ही जेव्हा ती योग्य प्रकारे समजून घेऊ तेव्हाच तर त्याचे निराकरण करू शकू.


चेतन भगत इंग्रजी कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...