आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सर पीडित मुलांसाठी पूजा हेगडेने दिले 2.50 लाख रुपये, म्हणाली - 'जितके शक्य असेल, तितके इतरांसाठी करा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'मोहनजो दाड़ो' आणि 'हाउसफुल 4' यांसारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री पूजा हेगडेने कॅन्सरशी झुंज देत असलेल्या दोन मुलांसाठी 2.50 लाख रुपये दान केले आहेत. ती अशातच क्युअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. हे आयोजन 6 व्या द्विवार्षिक 'कॅन्सर क्रूसेडर्स इंविटेशन कप' च्या घोषणेसाठी केले गेले होते. जे एक विश्वस्तरीय गोल्फ टूर्नामेंट आहे. हा इव्हेन्ट बाल कॅन्सर रोगींच्या सपोर्टसाठी फंड जमा करण्यासाठी आणि जागरूकता पसरवण्यासाठी आयोजित केला जाईल. 

'जितके शक्य असेल, तितके इतरांसाठी करा' : पूजा...   

दान दिल्याबद्दल पूजा म्हणाली, "मला नाही वाटत की, हे काही असे काम आहे, जे केवळ अभिनेता किंवा प्रसिद्ध व्यक्तींनीच केले पाहिजे. हे तुमच्या आतून यायला हवे. जे समाजाने दिले आहे, ते परत करण्याची सवय आणि संस्कृती बनवणे महत्वाचे आहे. तुम्हाला माहित नसते की, असे केल्याने तुम्ही किती लोकांना प्रेरित कराल. माझ्यावतीने हे एक छोटेसे योगदान होते. जास्तीत जास्त कॅन्सर पीडित मुलांचे उपचार शक्य आहेत. पैशांच्या अभावे ते थांबले नाही पाहिजे. प्रेमाने केले छोटेसे कामदेखील खूप काही करते. जेवढे शक्य असेल तेवढे इतरांसाठी करायला हवे."

आगामी चित्रपट तेलगुमध्ये प्रभाससोबत...  

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर बॉलिवूडमध्ये पूजाचा यापूर्वीच चित्रपट 'हाउसफुल 4' सुपरहिट झाला. यानंतर ती तेलगु भाषेत रिलीज झालेल्या 'अला वैकुंठपुर्रमलू' मध्ये दिसली. जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. तिचा आगामी तेलगु चित्रपट 'बाहुबली' फेम प्रभाससोबतच आहे, ज्याचे शूटिंग सुरु आहे.  

बातम्या आणखी आहेत...