आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान बाहुक पाठ करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र, स्तुती आणि आरतींची रचना करण्यात आली आहे. यामधीलच एक हनुमान बाहुक स्तोत्र आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हनुमान बाहुकचा पाठ रोज विधिव्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि त्यावर हनुमानाची कृपा कायम राहते. येथे जाणून घ्या, कशाप्रकारे करावा हनुमान बाहुक पाठ...


या विधीनुसार करावा हनुमान बाहुकचा पाठ
1.
रोज सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून एका लाल वस्त्रावर हनुमान मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.


2. हनुमानाला अबीर, गुलाल, लाल फुल आणि पूजन सामग्री अर्पण करावी. गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. पाठ पूर्ण होईपर्यंत दिवा चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.


3. घरात शुद्ध तुपात बनवलेल्या चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. हे शक्य नसल्यास गूळ-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.


4. त्यानंतर हनुमान बाहुक पाठ सुरु करावा. पाठ समाप्त झाल्यानंतर हनुमानाकडे कष्ट निवारणासाठी पार्थना करावी.


5. दररोज हा पाठ करणे शक्य नसल्यास केवळ मंगळवारी हनुमान बाहुकचा पाठ करू शकता.

बातम्या आणखी आहेत...