गरीबाघरीही लक्ष्मी पाणी / गरीबाघरीही लक्ष्मी पाणी भरू शकेल

May 24,2011 07:00:57 PM IST

ज्याच्याकडे धन नाही, त्याला धनाची अपेक्षा असते. आणि ज्याच्याकडे धनसंपत्ती असते त्याला आपण अधिक धन मिळविले पाहिजे असे वाटत असते. पण जीवनात अनेक चढ उतार येत असतात, त्यामुळे असे होताना दिसत नाही. परंतु पुढे दिलेल्या मंत्राचा जप श्रद्धेने आणि विधीनुसार केल्यास गरीब मनुष्यही श्रीमंत होऊ शकतो आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. हे मंत्र पद्मप्रभू तीर्थंकर यांचे अनाहत मंत्र आहे.
मंत्र
ओम णमो भगवदो अरहदो पोमे अरहतस्स सिञ्झ धम्मे, भगवदो विञ्झर महाविञ्झर पोमे महापोमे महापोमेश्वरी स्वाहा ।
हे मंत्र भूर्जपत्रावर किंवा धातूपत्रावर लिहून लाकडी चौरंगावर रेशमी वस्त्रात बांधून या यंत्राची प्राणप्रतिष्ठा करा. एखाद्या चांगल्या मूहुर्तावर प्रारंभ करून दररोज एक माळ जप करा. ही साधना वर्षभर करा. असे केल्याने मंत्र सिद्धीस जाऊन धन वैभवात वृद्धी होईल.


X