Cricket Special / काश्मिरमधील परिस्थितीचा परिणाम क्रिकेटवर, इरफान पठाणसहित 100 क्रिकेटपटूंना तत्काळ राज्य सोडण्याचे आदेश

17 ऑगस्टला दलीप ट्रॉफी सुरू होत आहे, त्यानंतर 50 षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात होईल

दिव्य मराठी वेब

Aug 04,2019 04:06:52 PM IST

श्रीनगर- भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणला आणि इतर जम्मू काश्मिर क्रिकेट टीममधील 100 क्रिकेटपटूंना तत्काळ राज्य सोडण्याची आदेश देण्यात आले आहेत. काश्मिरमधील अशांत वातावरणामुळे दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खबरदारीचा इशारा दिला होता. पठाण हा जम्मू काश्मिर क्रिकेट संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहतो. पठाणसह जम्मू काश्मिर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिलाप मेवाडा आणि सुदर्शन वीपी यांनाही राज्य सोडून आपला जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मूळ जम्मू काश्मिरचे रहिवासी नसलेल्या निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही आपापल्या गावी जाण्यास सांगिचसे आहे.

स्थानिक क्रिकेटपटूंसाठी येणारा काळ चांगला आहे. 17 ऑगस्टला दलीप ट्रॉफी सुरू होत आहे, त्यानंतर 50 षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात होईल. रणजी करंडकाचे साखळी सामनेही 9 डिसेंबरपासून सुरू होणार असल्यामुळे क्रिकेटपटू या काळात सरावाला सुरुवात करतात. पण आता राज्याबाहेर जावे लागल्याने त्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे.


जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनने राज्यात क्रिकेट संबंधी सर्व उपक्रम रद्द केले आहेत. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मिर स्टेडियममधील कॅम्पमध्ये असलेल्या विविध वयोगटातील 100 क्रिकेटपटूंना परत पाठवण्यात आले आहे. क्रिकेट अॅक्टिव्हिटीज पुन्हा कधी सुरु करायच्या, याबाबतचा तुर्तास कोणतिही माहिती नाहीये.


हिंदूंचे तीर्थस्थान असलेल्या अमरनाथ यात्रेवरही दहशवादी हल्ल्याचे सावट आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहाता राज्य सरकारने खबरदारी म्हणून ही यात्रा स्थगित केली आहे. यात्रेकरुंसह पर्यटकांनाही काश्मीर तातडीने रिकामे करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सुरक्षा दलाला अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सर्च ऑपरेशनदरम्यान स्नायपर रायफल आढळून आल्या. त्यानंतर ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

X
COMMENT