आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाच्या मूर्तींची ही अवस्था पाहा आणि किमान पुढल्या वर्षी तरी पीओपीच्या मूर्ती टाळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - दहा दिवस अगदी विधिवत बाप्पाती आराधना केल्यानंतर रविवारी शहरातील कृत्रिम तलाव आणि साबरमती नदीत विसर्जन करण्यात आले. पण विसर्जनानंतर बाप्पांच्या मूर्तीची अवस्था पाहून मातीच्या मूर्तींची स्थापना करून घरीच त्याचे विसर्जन करणे योग्य आहे हे लक्षात येते. अनेक ठिकाणी मूर्ती जेसीबी आणि क्रेनने तोडण्यात आल्या. सोमवारी डंपरच्या 184 फेऱ्या करून 527 टनाचा ढिगारा डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात आला. 

 
जागरुकता गरजेची 
एक जेसीबी ड्रायव्हर म्हणाला की, आमच्याही भावना दुखावल्या जातात. लोकांनी घरीच विसर्जन करायला हवे. मूर्ती याप्रकारे कचऱ्यामध्ये फेकणे आम्हालाही योग्य वाटत नाही. पण आम्ही काय करणार, हेच आमचे काम आहे. लोकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. 

 
कारवाई करणार 
अहमदाबादच्या महापौर बीजल पटेल म्हणाल्या की, कोणाच्या निर्देशावरून असे केले हे माहिती नाही, पण असे व्हायला नको होते. मुद्दा श्रद्धेचा आहे. त्यामुळे धार्मिक बावना दुखावतील. यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल. 

 
पाण्यात बुडवून बाहेर काढल्या मूर्ती 
चेतन प्रजापती म्हणाले की, रविवारी रात्री 10:30 च्या सुमारास आम्ही विसर्जनासाठी साबरमतीच्या किनाऱ्यावर पोहोचलो. त्याठिकाणी पीओपीच्या मूर्तीच्या विसर्जनाला बंदी असल्याचे समजले. आम्ही किनाऱ्यावर मूर्ती ठेवल्या. मोठ्या मूर्ती क्रेनच्या मदतीने फक्त पाण्यात बुडवून बाहेर काढल्या जात होत्या. नंतर संख्या वाढली तर मूर्ती किनाऱ्यावरच ठेवल्या जाऊ लागल्या. रात्री उशिरा एका मित्राने पोनवर सांगितले की, बुलजोडरच्या मदतीने मूर्ती तोडल्या जात आहेत. 
 

भास्करचे अभियान 
दैनिक भास्कर समूह अनेक वर्षांपासून मातीच्या गणेशाची स्थापना आणि घरीच विसर्जनाचे अभियान चालवत आहे. तलाव आणि नद्यांचे प्रदूषण होऊ नये हा यामागचा उद्देश आहे. अनेक लोकांनी यात सहभागी होत मातीच्या गणेशाची स्थापना आणि घरीच विसर्जन केले. 

बातम्या आणखी आहेत...