आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नणंद-भावजय नव्हे मैत्रिणीच! वहिनी दीपिकासाठी नणंदने होस्ट केली शानदार पार्टी, अनुष्कापासून ते ट्विंकलपर्यंत नणंदेसोबत या अभिनेत्रींचे आहे खास बाँडिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेंदी सेरेमनीत नणंद रितिकासोबत दीपिका पदुकोण, नणंद अलका भाटियासोबत ट्विंकल खन्ना - Divya Marathi
मेंदी सेरेमनीत नणंद रितिकासोबत दीपिका पदुकोण, नणंद अलका भाटियासोबत ट्विंकल खन्ना

मुंबईः  रणवीर-दीपिका 14-15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दहा दिवसांनी रणवीरची बहीण आणि दीपिकाची नणंद रितिकाने त्यांच्यासाठी एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. इतकेच नाही तर रितिकाने तिच्या वहिनीला यावेळी खास भेटवस्तूही दिली. यामध्ये चॉकलेट आणि मिठाईसोबत दीपिकाच्या चित्रपटांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये नणंद-भावजयच्या अनेक जोड्या असून त्यांच्यात खास बाँडिंग बघायला मिळते. या नणंद भावजया म्हणजे जणू एकमेकींच्या मैत्रिणीच आहेत. एक नणंद तर तिच्या वहिनीला धाकटी बहीण मानते. आम्ही तुम्हाला सांगतोय बॉलिवूडच्या 7 प्रसिद्ध नणंद-भावजयच्या जोडींविषयी... 

 

ट्विंकल खन्ना आणि अलका भाटिया
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे लग्न प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांची लेक ट्विंकल खन्नासोबत झाले आहे. अक्षयला एक सख्खी बहीण असून अलका भाटिया हे तिचे नाव आहे. अलकाने 2012मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठे असलेले बिझनेसमन सुरेंद्र हिरानंदानीसोबत लव्ह मॅरेज केले. अलका हाऊसवाइफ आहे. तिने काही वर्षांपूर्वी 'फगली' या चित्रपटाची निर्मिती केली होती. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या प्रसिद्ध नणंद-भावजयच्या 6 जोड्यांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...