आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करतेय उतरनची इच्छा, महिन्यातून फक्त 6-7 दिवस करते काम, इतरवेळी या खास गोष्टीवर करते फोकस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'उतरन' मधील इच्छा तुम्हला आठवतेय का ? इच्छाचे पात्र साकारणारी स्पर्श कंचनदानी आता 17 वर्षांची झाली आहे. ती 5 वर्षानंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. तिची शेवटची मालिका 'परवरिश' होती. शिक्षण पूर्ण करायचे होते म्हणून तिने मालिका सोडली होती. आता ती लवकरच आध्यात्मावर आधारित 'विक्रम बेताल' मालिकेत दिसणार आहे. यात ती भूताचे पात्र साकारणार आहे. दैनिक भास्कर सोबत बोलताना स्पर्शने अभिनयातून घेतलेला ब्रेक, भविष्याची प्लानिक आणि इतर विषयावर चर्चा केली... 

 

आईच्या इच्छेखातर परतली अभिनय क्षेत्रात... 
स्पर्शची अभिनय क्षेत्रात करिअर करायची इच्छा नव्हती. याविषयी ती सांगते, माझे वडील वकील आहेत, त्यामुळे मलाही वकील व्हायचे आहे आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे. मात्र मी अभिनय करावा अशी माझ्या आईची तीव्र इच्छा आहे. मला टीव्हीवर पाहणे तिला आवडते. तिच्यासाठी मी पुनरागमन केले. 

 

> अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते तर विक्रम वेताळ मालिका का निवडली ? 
हो, खरचं मला अभिनयात करियर करायचे नव्हते. मला बऱ्याच ऑफर मिळाल्या होत्या मात्र त्यांची संकल्पना मला आवडली नव्हती. जी संकल्पना आवडत नाही, त्या भूमिकेला मी न्याय देऊ शकणार नाही, असे मला वाटते. त्यामुळे त्या भूमिका केल्या नाहीत. मला जी गोष्ट जास्त आवडते त्यावरच मी जास्त लक्ष दिले ते म्हणजे माझे शिक्षण. मला वकील व्हायचे आहे आणि समाजासाठी काम करायचे आहे. माझे वडील वकील आहेत त्यामुळे मलाही त्यांच्यासारखे व्हायचे आहे. मात्र माझ्या आईला अभिनायचे प्रचंड वेड आहे. मला पडद्यावर पाहणे तिला आवडते. तीच मला अभिनय करण्यासाठी प्रेरित करत असते. विकम वेताळसाठी मला महिन्यातून 6 ते 7 वेळेसच काम करावे लागते. त्यामुळेच मी मालिकेला होकार दिला होता. अभिनयाबरोबरच मला शिक्षणावरदेखील लक्ष केंद्रित करायचे आहे. 

 

> मालिकेतील तुझ्या पात्राविषयी काही सांगशील का ? 
यात मी तरुण भूत 'टायनी टिंकर वेल'चे पात्र साकारत आहे. ती वेताळची चांगली मैत्रीण असते. माझ्या आणि वेताळमध्ये टॉम आणि जैरीसारखी मैत्री पाहायला मिळेल. हे पात्र खूपच निरागस आहे. ते विक्रमला त्रास देण्यासाठी वेताळची मदत करत असते. 


> उतरन मालिकेच्या 10 वर्षांनंतरही लोक तुला इच्छाच्या नावानेच ओळखतात.. 
ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यावेळी मी फक्त 6 ते 7 वर्षाची होते. त्यावेळी ती मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. खरं तर, लोकांनी माझे काम आणि माझे पात्र लक्षात ठेवले, याचे मला खरचं नवल वाटते. त्यामुळे मला खूप-खूप आनंद होतो. त्यामुळे मी आजही प्रेक्षकांसाठी इच्छाच बनून राहिन. 

 

> वकील व्हायचे आहे तर समाजाच्या कोणत्या समस्यावर तुला लढावे वाटते ? 
पर्यावरण... मला पर्यावरणाची फार काळजी आहे. जे लोक याच्याशी खेळ करतात, त्यांच्याविरुद्ध मी लढणार आहे. काही लोकांविरुद्ध मी याचिकादेखील दाखल केल्या आहेत. येणाऱ्या पीढीला आपण काय देणार आहेात, याचा प्रत्येकांनी विचार करायला हवा. पर्यावरणाचे नुकसान पाहून मला प्रचंड त्रास होतो, यासाठी मी लढणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...