आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसंख्येमुळे शतकाअखेर अन्नाचा खप 80% वाढणार, स्वस्त भोजनाने गरिबांचे वजन वाढेल, मात्र कुपोषण राहील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशोधन- उंच, वजनदार व्यक्तींना लागणार अधिक भोजन
  • लोकांत रोज सरासरी 253 कॅलरीची वाढ होऊ शकते

​​​​​​लंडन : जगाची लोकसंख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे आगामी काळात जगभरातून भोजनाची मागणी वाढणार आहे. कारण आगामी काळातील लोकसंख्येत उंच आणि वजनदार व्यक्तींची संख्या लक्षणीय असेल. पुरवठादार ही मागणी पूर्ण करू शकणार नाहीत अशीही स्थिती येण्याची शक्यता आहे. जर्मनीतील गॉटिनगेन विद्यापीठाच्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. संशोधकांच्या मते, २०१० ते २१०० या काळात लाेकांत सरासरी २५३ कॅलरीची अधिकची आ‌वश्यकता भासेल. तसेच जगभरातून खाद्यपदार्थांची मागणी शतकाअखेरपर्यंत ८०% नी वाढ होईल. त्यात ६० % खाद्यपदार्थांचा खप लोकसंख्या वाढल्याने आणि २० % उंच व्यक्तींमुळे वाढेल. या उंच व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) जास्त असेल. सर्वसाधारणपणे पुरुषांना रोज २५०० आणि महिलांना २००० कॅलरीची गरज असते. संशोधनात म्हटले आहे, लोकसंख्या वाढीशिवाय अशा उंच व्यक्तींच्या गरजपूर्तीसाठी जगभरात अतिरिक्त भोजनाची गरज भासेल. ही गरज २०१० मधील भारताच्या आणि नायजेरियाच्या संयुक्त कॅलरीच्या आ‌वश्यकतेपेक्षा अनेक पटीने जास्त राहील. या वाढीचा अफ्रिकेतील देशांवर जास्त परिणाम होईल.

इंग्लंडपासून ते मेक्सिकोपर्यंत वाढेल व्यक्तींची उंची

इंग्लंडमध्ये पुरुष आणि महिलांची उंची मागील शतकात ११ सेंमीने वाढली आहे. सध्या पुरुषांची सरासरी उंची १७८ सेंमी आणि महिलांची १६१ सेंमी आहे. मेक्सिको हा अमेरिकेनंतरचा जगातील दुसरा सर्वाधिक बॉडी मास इंडेक्स असणारा देश आहे. १९८० पर्यंत मेक्सिकोत कुपोषण ही सर्वात मोठी समस्या होती. येथील लोक स्थूलत्वाचे शिकार झाले होते.