आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या मैत्रीणीला मारून मृतदेहाशी बनवले संबंध; दिवसभर हिंसक पॉर्न मूव्हीज पाहून Psycho झाला तरुण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - हिंसक पॉर्न मूव्हीज पाहण्याचे किती घातक परिणा होऊ शकतात याचे धक्कादायक उदाहरण इंग्लंडमध्ये समोर आले आहे. टेलफोर्ड शहरात राहणारा 23 वर्षीय जेमी रेनल्ड दिवसभर पॉर्न मूव्हीज पाहायचा. त्यातही हिंसक पॉर्न मूव्हीजचे त्याला अक्षरशः व्यसन लागले. अशा प्रकारच्या मूव्हीज पाहून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. यानंतर जे दररोज पाहतो, तेच त्याने प्रत्यक्षात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने आपल्या सख्ख्या बहिणीच्या मैत्रिणीला बहाण्याने घरी बोलावून तिची निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे, तर तिचे मृतदेह घरी ठेवून त्यासोबत शारीरिक संबंध बनवले. नराधम जेमीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केला. आपण जे रोज पाहत होतो, हुबेहूब तसेच केले अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. 


म्हणाला, हिंसाचाराचा वेगळाच आनंद!
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कबुली जबाबाचे धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याचे कृत्य इतके घृणास्पद आहेत, की त्यावर डॉक्युमेंट्री सुद्धा तयार केली जात आहेत. जेमी रेनल्डने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, "गळा आवळण्याचे आणि नग्न महिलांसोबत हिंसाचार होत असताना पाहून मला खूप आनंद होतो." आरोपीच्या आजोबांनी सांगितले, की जेमी दिवस-रात्र फक्त आणि फक्त हिंसक पॉर्न पाहायचा. त्याचे मोबाईल अश्लील आणि हिंसक पॉर्न व्हिडिओ, फोटोंनी भरले होते. 


बहिणीची मैत्रिणीला असे बोलावले...
> 17 वर्षीय जॉर्जिया आरोपी जेमीच्या मोठ्या बहिणीची मैत्रीण होती. जेमीने तिच्याशी आधी मैत्री केली. जॉर्जिया मनमिळावू असल्याने तिने जेमीला आपल्या इतर मित्र-मैत्रिणींचीही भेट करून दिली आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सामिल केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेमी सुरुवातीपासूनच जॉर्जियाकडे आकर्षित होता. या दोघांची भेट नेहमीच सर्व मित्रांसमोर व्हायची. यावर जेमी तिला वारंवार एकांतात भेटण्यासाठी विनंत्या करत होता. परंतु, जॉर्जियाला आधीच बॉयफ्रेंड होता. त्यामुळे, तिने प्रत्येकवेळा जेमीच्या प्रस्तावाला नकार दिला. 
> जेमी फोटोग्राफर बनू इच्छित होता. त्याने जॉर्जियाचे काही फोटो क्लिक केले होते. एक दिवस त्याने जॉर्जियाला आपल्या प्रोजेक्टमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने घरी बोलवाले. जॉर्जिया आपल्या घरातून रात्री 8 वाजता बाहेर पडली. जेमीचे घर अगदी जवळ होते. परंतु, यानंतर जॉर्जिया कधी परतलीच नाही. 


काय घडले त्या रात्री?
> आपली मुलगी जॉर्जिया रात्री परतली नसल्याने चिंतीत आई-वडिलांनी तिच्या फोनवर मेसेज पाठवला. त्या मेसेजला मिळालेले उत्तर असे होते, "मी मैत्रिणीच्या घरी थांबले आहे. आता रात्री नाही, सकाळी घरी येईन." पण, दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा जॉर्जिया परतली नाही. तिने पालकांच्या फोनला देखील उत्तर दिले नाही. तेव्हा पालकांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली. 
> पोलिसांनी जॉर्जियाच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन चेक केले, तेव्हा त्यांना जेमीच्या घरचा पत्ता सापडला. जेमीच्या घराच्या परिसरात पोलिसांनी शोध घेतल्यानंतरही तिचा पत्ता काही लागला नाही. याच दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्याने जेमीचे एक जुने प्रकरण समोर आणले. जेमीच्या फोनमध्ये काही दिवसांपूर्वीच एक एडिट केलेला फोटो पोलिसांच्या हाती लागला होता. त्यामध्ये जेमीने आपल्या एका मैत्रिणीच्या फोटोला एडिट करून तिच्या गळ्याभोवती गळफास लावला होता. तरीही पोलिसांनी त्याला वॉर्निंग देऊन सोडून दिले. हीच पोलिसांनी केलेली सर्वात मोठी चूक ठरली. 


मग हाती लागला कॅमेरा
तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती जेमीचा एक कॅमेरा लागला. त्यामध्ये जेमीने केलेल्या घृणास्पद कृत्याचा खुलासा झाला. त्यात सापडलेल्या एका व्हिडिमध्ये जॉर्जिया एका फासावर लटकलेली होती. तिच्या पायाखाली एक बॉक्स होता. त्याच बॉक्सला जेमीने लाथ मारली आणि जॉर्जियाचा तळपून मृत्यू झाला. यानंतर जेमीने तिच्या मरण्याची वाट पाहिली. मग, तिचे कपडे काढून मृतदेहासोबत शारीरिक संबंध बनवले. पोलिसांनी याच व्हिडिओच्या आधारे जेमीला अटक केली. जेमीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका तलावात विवस्त्र अवस्थेत जॉर्जियाचा मृतदेह सापडला. जेमीच्या घरातून पोलिसांना 16 हजार महिलांचे फोटो सापडले. त्या सर्व महिलांसोबत हिंसक अत्याचार झाल्याचे दिसून येत होते. त्याने हे फोटो विविध ठिकाणांवरून आणि ऑनलाईन स्वरुपात प्रिंट करून ठेवले होते. पोलिसांनी जेमीला त्या एडिटेड फोटोसह तेव्हाच पकडले असते तर आज आपली मुलगी जिवंत राहिली असती अशा भावना जॉर्जियाच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...