आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील फोटो व्हॉट्सअॅपवर टाकले; मादणी येथील शिक्षकावर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठविणे, सिल्लोड तालुक्यातील मादणी येथील शिक्षक सुनील ढोले याला चांगलेच महागात पडले. दरम्यान, ग्रुप अॅडमिनच्या तक्रारीवरून अजिंठा पोलिस स्टेशनला शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील पोस्ट टाकणाऱ्या शिक्षकावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

 

तक्रारदार हरीश बाबासाहेब घायवट (१९) या युवकाने छत्रपती सरकार एच. जी. पाटील या नावाने व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केलेला आहे. ग्रुपमध्ये मित्र गावातील काही नामांकित व प्रतिष्ठित व्यक्तींना समाविष्ट करण्यात आले आहे. याच ग्रुपमध्ये असणाऱ्या मादणी येथील नाटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सुनील ढोले यांनी शनिवारी पावणेसहाला ग्रुपवर नग्न अवस्थेतील एक फोटो पोस्ट केला आहे. हा अश्लील फोटो पाहून ग्रुपअडमिन हरीश घायवट व ग्रुप सदस्यांनी शनिवारी (दि. १८) रोजी रात्री उशिरा अजिंठा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...