आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज 12-12 तासांची शिफ्ट, असह्य वेदनेतही Pain Killer घेऊन करावे लागते शूटिंग; प्रत्यक्षात अशी आहे पॉर्न स्टारची Life

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - जगभरात पॉर्न फिल्मच्या मानसिक परिणामांवर चर्चा सुरू आहे. भारतात अनेक टेलीकॉम कंपन्यांनी पॉर्न साइट्स ब्लॉक केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एका पॉर्नस्टारची आपबिती व्हायरल होत आहे. यात तिने अॅडल्ट चित्रपटांचे सत्य लोकांना सांगितले. 35 वर्षीय ऑस्ट्रेलियन पॉर्न स्टार मॅडिसन मिसिनाने सांगितल्याप्रमाणे, पॉर्न मूव्हीज पाहताना जसे वाटते त्यांचे सत्य त्याहून अगदी उलट आहे. प्रत्यक्षात अशा फिल्ममध्ये महिलांच्या शरीराचे केवळ एक निर्जीव वस्तू म्हणून शोषण केले जाते. 


मशीनसारखे करावे लागते काम...
- मॅडिसन सांगते, की दोन लोकांमध्ये सर्वात जवळचे संबंध कॅमेऱ्यासमोर प्रस्तुत करणे काही सोपे काम नाही. आम्हाला एका मशीनप्रमाणे काम करावे लागते, ज्याच्या अनुभवाची सामान्य लोक कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत. अनेकवेळा हा अनुभव अतिशय वेदनादायक असतो. 
- वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षापासून पॉर्न इंडस्ट्रीत आलेली मॅडिसन हिने आतापर्यंत 200 अॅडल्ट चित्रपट केले आहेत. तिने सांगितल्याप्रमाणे, ''कॅमऱ्यासमोर योग्य शॉट देण्याच्या नादात आम्ही आमच्या शरीराचा खूप वापर करून घेतो. या दरम्यान होणाऱ्या वेदना कुणालाही सांगता येत नाहीत. ठराविक फिल्म बनवण्यासाठी किंवा पोझ देण्यासाठी अनेकवेळा अनैसर्गिक कृत्य देखील करावे लागते. त्याच्या वेदना शब्दात मांडताच येणार नाहीत.''
- "पॉर्न मूव्हीज करत असल्याने आमच्या अंडाशय आणि गर्भाशयावर खूप वाइट परिणाम होतो. अनेकवेळा पॉर्नस्टारच्या गर्भाशयात गाठ तयार होते आणि शूटिंग सुरू असताना ती गाठ फाटते. कितीही वेदना झाल्या तरी अॅक्टर शॉट कट करू शकत नाही. कारण, प्रत्येक मूव्हीसाठी लांब सीन शूट करणे बंधनकारक आहे."


शूटिंगपूर्वी फोटोग्राफीच्या नावे छळ
पॉर्न फिल्म शूट करण्यापूर्वी प्रस्तावित स्क्रिप्टनुसार, पॉर्न स्टार आणि सहकलाकारांना फोटोशूट करावा लागतो. प्रत्येक सीन अॅक्टर्सला स्मरणात राहावा आणि सर्व काही स्क्रिप्टनुसार जावे यासाठी कलाकारांना पोझ द्यावे लागतात. अनेकवेळा व्हिडिओ शूट करण्यापूर्वी असे फोटोशूट करण्यातच दिवस जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अॅडल्ट अॅक्टर्सना तशाच अवस्थेत स्वतःच्या अंगाशी खेळ करत राहावा लागतो. या ठिकाणी शरीराला एक निर्जीव वस्तूसारखे ट्रीट केले जाते.


रोज 12 तासांची एक शिफ्ट
- मॅडिसनने आपल्या अनुभवात म्हटले आहे, की एका महिला पॉर्नस्‍टारला सकाळी वाजता तयार होऊ कुठल्याही परिस्थितीत 10 वाजेपर्यंत स्टुडिओत हजेरी लावावी लागते. तेथे कागदी कारवाया आणि मेक-अपमध्ये किमान 1 तास रोज निघून जातो.
- दुपारचे 12 वाजताच एकट्याने फोटोग्राफी केली जाते. एका पॉर्न स्टारला स्टुडिओमध्ये थांबलेल्या डझनभर लोकांसमोर आपले सगळेच कपडे काढून अंग प्रदर्शन करावे लागते. पॉर्न स्टार कितीही बोल्ड असली तरी मानसिकरित्या सर्वांसमोर कपडे काढून शरीराचे प्रदर्शन करणे काही सोपे काम नाही.
- फोटोग्राफी होणार तोपर्यंत पुरुष अॅडल्ट स्टार शूटिंगसाठी पोहोचतात. यानंतर 2 तास व्हिडिओ शूटिंग केली जाते. अनेकवेळा योग्य सीन मिळत नाही तोपर्यंत एकच पोझ वारंवार करावी लागते. अशात काम संपवून घरी जाण्यासाठी संध्याकाळ होणे रोजचेच आहे. व्हिडिओ शूटिंग झाल्यानंतर सुद्धा पुन्हा फोटोग्राफी करून दिवसाचे काम संपवले जाते. एकूणच एका पॉर्न स्टारला किमान 12 तासांची शिफ्ट करावी लागते.


विविध प्रकारच्या औषधी घेऊन करावे लागते काम
मॅडिसनने सांगितल्याप्रमाणे, पॉर्न स्टारला विविध प्रकारच्या औषधी घेऊन काम करावे लागते. त्यापैकी अनेक जणी पेन किलर टॅबलेट आणि इंजेक्शन घेऊन काम करतात. इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागत असल्याने पुरुष पॉर्न स्टार व्हियाग्रा सेवन करतात. तर काही सर्वांसमोर हे सर्व काही करण्याचे धाडस मिळावे या हेतूने नशा करून काम करतात. अॅडल्ट अॅक्टरला दर 10 दिवसांनी मेडिकल टेस्टला सामोरे जावे लागते. यात एचआयव्हीसह सेक्समार्फत पसरणारे संसर्गजन्य रोग यांची चाचणी केली जाते. मेडिकल टेस्टमध्ये नाहर्कत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत पुढील मूव्ही शूट करता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...