आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pornstar Johnny Sins Thanks Ex Pakistan Envoy Abdul Basit For New Twitter Followers

पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारतावर खापर फोडण्यासाठी वापरला पॉर्न स्टारचा फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीर प्रकरणी भारतावर आरोप करण्याच्या नादात पॉर्नस्टार जॉनी सिन्सचा फोटो रिट्विट केला होता. यानंतर जॉनी सिन्सने एक खोजक ट्वीट करत पाकिस्तानचे आभार मानले आहेत. 

‘ अब्दुल बासित यांच्यामुळे मला नवीन फॉलोअर्स मिळाले. याबद्दल  यांचे आभार. पण माझी दृष्टी शाबूत आहे’ असे ट्वीट करत जॉनीने पोस्ट केले.

'काश्मीरमधील अनंतनागमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या पॅलेट गनच्या हल्ल्यात युसूफ नावाच्या व्यक्तीची दृष्टी गेली आहे. त्याच्या बाजूने उभे राहा’ असे ट्वीट अब्दुल बासित यांनी रिट्वीट केले होते. यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. 

अब्दुल बासित यांनी रिट्वीट केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार नायला इनायत यांनी देखील बासित यांच्या ट्विटचे अनेक स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. मात्र, बासित यांनी ते रिट्वीट डिलीट केलेले असावे. जॉनी सीन्सचं ट्विटर अकाऊण्ट व्हेरिफाईड असून त्याला तीन लाख 51 हजारांपेक्षा जास्त लोक फॉलो करत आहेत. 40 वर्षांच्या जॉनी सिन्सचे मूळ नाव स्टीवन वूल्फ आहे. तो अडल्ट इंडस्ट्रीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

बातम्या आणखी आहेत...