Home | National | Other State | Port issue is main highlight in Kanyakumari, fisherman's opinion will be main

कन्याकुमारीत बंदरचा मोठा मुद्दा, मच्छीमारांची भूमिकाच निर्णायक

अमित निरंजन | Update - Mar 17, 2019, 12:24 PM IST

अम्मा अजूनही मनमानात, मोबाइलवरही

 • Port issue is main highlight in Kanyakumari, fisherman's opinion will be main

  कन्याकुमारी/त्रिची- देशातील शेवटचे टोक कन्याकुमारीला लागून असलेले कोडछला बंदर. दुपारी १ वाजता बंदरात खूपच धावपळ होती. या वेळी मॅथ्यू घाईने आपली नाव किनाऱ्यावर लावत मासे लिलाव केंद्राकडे पळाला. धावपळीचे कारण विचारले असता मॅथ्यू रागवून म्हणाला, 'आता बंदर बनवले आहे. यामुळे मासे लांब खाेल पाण्यात गेले आहेत. मासे पकडण्यासाठी समुद्रात खूप लांब जावे लागते. पूर्वी तीन तास लागत होते. अाता पाच तास लागतात.' मॅथ्यूसारखा इतर मच्छीमारांचा हाच राग आहे. तीसपेक्षा जास्त गावातील मच्छीमार या बंदराला विरोध करत आहे. १५ ते २० टक्के मच्छीमार कन्याकुमारीचे भविष्य बदलण्याची ताकद ठेवू शकतात.
  मुक्त पत्रकार ठागूर थॉमस म्हणतात, 'मागील निवडणुकीत डीएमके व काँग्रेसने वेगवेगळी निवडणूक लढवली होती. यामुळे मासेमारांची मते विभागली गेली. त्याचा फायदा भाजपला झाला. तामिळनाडूतील एकमात्र जागा भाजपला मिळाली. आता डीएमके व काँग्रेस एकत्र आहे आणि बंदर बनत असल्यामुळे मच्छीमारांची नाराजी भाजपसाठी नुकसानकारक ठरू शकते.' भाजपच्या कार्यालयात संघटनमंत्री कृष्णामर्थी मच्छीमारांचा मुद्दा स्वीकारतात. ते म्हणाले, ' केंद्र लहान बंदर बनवण्यासाठी विचार करत आहे.' काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राधाकृष्णन यांनी म्हटले, 'मच्छीमार सतत हेलिपॅडची मागणी करत आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना मदत करता येणे शक्य आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.'

  अम्मा अजूनही मनमानात, मोबाइलवरही

  २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपचे के राधाकृष्णन कन्याकुमारीहून निवडून आले. ते १.२८ लाख मतांनी जिंकले. १९९९ च्या निवडणुकीत ही जागा भाजपकडे होती. एकूण दोन वेळा ही जागा भाजपकडे राहिली.


  मते : मच्छीमार लोक निर्णायक सिद्ध होतील
  ४०% हिंदू व ४५% ख्रिश्चन मते आहेत. ५% मुस्लिम व अन्य ५% मते अन्य धर्मातील नागरिकांची आहे. ख्रिश्चनमध्ये एक चतुर्थांश लोकसंख्या मच्छीमारांची आहे. जवळपास २ लाख मते हे विजयाचे गणित निश्चित करतील.


  आज दक्षिणेतून दिल्लीकडे
  २००८ मध्ये परिसीमननंतर कन्याकुमारी मतदारसंघ झाला. यापूर्वी हे नगरकॉईल नावाने ओळखले जाई. येथून एन डेनिस सहा वेळा खासदार झाले आहे. (१९८०,८४,९८,९१ काॅंग्रेसकडून तर ९६ व ९८ मध्ये तमिळ मनिला काँग्रेस) डेनिस यांच्यानंतर कोणताही चेहरा सतत विजयी झाला नाही.


  सवर्ण आरक्षण गेमचेंजर ठरेल
  येथे एअर स्ट्राइकचा मुद्दा निर्णायक दिसत नाही. एअरस्ट्राइकची चर्चा अाहे. परंतु माेठा मुद्दा नाही. राम मंदिराचा मुद्दाही नाही. परंतु सवर्ण आरक्षण गेमचेंजर ठरू शकते. त्याची चांगलीच चर्चा आहे.


  त्रिची, परिसरातील मतदारसंघात नोटबंदी, जीएसटी हेच प्रभावी मुद्दे
  कन्याकुमारीहून निघून त्रिचिल्लापल्ली पोहोचलो. येथील तापमान ४० अंश सेल्सियस. कावेरी ब्रिजवर उभ्या असलेल्या मुथुकडून नारळ घेतले. नारळमध्ये पाणी इतके की एका दमात पिऊ शकलो नाही. अचानक लक्ष गेले आणि प्रश्न निर्माण झाला हे काय...? मुथुच्या मागे तामिळनाडूची लाइफलाइन समजली जाणारी कावेरी नदी बिल्कुल कोरडी...शेवटपर्यंत फक्त वाळूच. कर्नाटक व तामिळनाडूत संघर्षाचा मुद्दा राहिलेला कवेरीचा प्रश्न येथे महत्त्वपूर्ण ठरत असतो. कावेरीच पॅरम्बलूर व सेलम शहराला पाणीपुरवठा करते. तिरुचिरापल्ली, करूर, नामाक्कल व तंजावूर जागेवर कावेरीचे पाणी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा मुद्दा आहे. विशेषज्ञ म्हणतात, शहरातील युवकांचा कल मोदींकडे असू शकतो. परंतु पाणी न मिळाल्याने नाराज झालेले शेतकरी डीएमके-काँग्रेस आघाडीकडे जाऊ शकतात.


  त्रिची खासदार कुमार (एआयएडीमके) म्हणतात, निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल. काँग्रेसचे शहर अध्यक्ष जवाहर म्हणतात, 'त्रिची विमानतळ व स्मार्ट सिटी कुठे अाहे? पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आहे. हे कोणी विसरू शकणार नाही.' हिंदूचे माजी पत्रकार व्ही गनापथी म्हणतात, लोक येथे चेहरा पाहून मतदान करतात. निवडणुकीच्या वेळेस मुद्दे खूप मागे पडून जातात. स्मॉल स्केल डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कनागसाबपाथी म्हणतात, नोटबंदी व जीएसटीमुळे व्यवसायावर परिणाम झाला. त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल.


  तामिळनाडूतील ७ महत्त्वाच्या जागांचे गणित कन्याकुमारी, तिरुचिरापल्ली, करूर, पॅरम्बलूर, नामाक्कल, सेलम व तंजावूरमधील परिस्थिती.


  डीएमकेला हवी मतदारांची 'करुणा'
  कन्याकुमारी ते त्रिची मार्गावर निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.बॅनर लावले जात आहेत.
  हे मुद्दे काय? : सवर्ण आरक्षण व नोटबंदीचा असेल परिणाम
  नोटबंदी व सवर्ण आरक्षण मोठे मुद्दे असतील. डीएमकेने याविरोधात चेन्नई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे डीएमके विराेधात नाराजी दिसत आहे. परंतु डीएमकेने हा निर्णय ८० टक्के ओबीसी एससी-एसटी लाेकसंख्येला समाेर ठेवून घेतला अाहे.


  मागील निवडणुकीचे निकाल : सहा जागा तिरुचिरापल्ली, करूर, पैरम्बलूर, नामाक्कल, सेलम व तंजावूर एआयएडीएमकेजवळ अाहे. अाता भाजपसाेबत युती झाली असल्याने एकत्र येऊन िनवडणूक लढणार अाहे.


  जातींचे गणित : येथे अाेबीसी मतदार निर्णायक ठरणार अाहे. ७० ते ७५% मते यांचीच अाहेत.याशिवाय १५% मते ब्राह्मण व सवर्णांची अाहेत.


  येथे अशी अाघाडीभाजप+एआयएडीएमके+पीएमके
  काँग्रेस+ डीएमके+सीपीएम


  सध्याचे गणित? : निर्मला सीतारमण युवकांमध्ये लोकप्रिय
  निर्मला सीतारमणसारखी माेठी नावे त्रिचिल्लापल्लीहून निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता अाहे. सीतारामण यांचे शिक्षण येथून झाले अाहे. युवकामंध्ये त्या लाेकप्रिय अाहेत.


  डीएमकेचे लक्ष 'ग्राॅस रूट'वर अाहे. मागील निवडणुकीपेक्षा त्यांची परिस्थिती चांगली अाहे.


Trending