आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेर्तुगालच्या सुपरस्टार राेनाल्डाेने कुटुंबीय, खासगी आयुष्य, प्रतिस्पर्धी मेसीवर केली चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहा वर्षांचा असताना राेनाल्डाे अाई-वडिलांसमवेत. - Divya Marathi
दहा वर्षांचा असताना राेनाल्डाे अाई-वडिलांसमवेत.

लंडन - क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव समाेर आले की, डाेळ्यासमाेर  तीन गाेष्टी सहज उभ्या राहतात. यात पहिले म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू, दुसरे म्हणजे जगातील सर्वात फिट खेळाडूंमधील एक आणि सर्वात आक्रमक. तिसरे आणि शेवटचे म्हणजे आक्रमकता असलेला पाेर्तुगालचा सर्वात लाेकप्रिय  फुटबॉलपटू. 
 मुलाखतीदरम्यान जगातील सर्वात लाेकप्रिय फुटबॉलपटू राेनाल्डाे हा मुलाखतीदरम्यान वडीलांच्या आठवणींनंतर अधिकच भावुक झाला.  वडीलांनी मला नंबर वन  झाल्यानंतर पाहिले नाही, याचीच मला  सातत्याने खंत वाटत आहे.  राेनाल्डाे  हा २० वर्षांचा असताना त्याच्या वडीलांचे निधन झाले. सध्या राेनाल्डाे हा  सर्वात अव्वल आहे.
15 वयाच्या १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. त्यामुळे मला प्रचंड मेहनतीच्या बळावर यशाचा माेठा पल्ला गाठता आला. यातून मला लाेकप्रियताही मिळवता आली. मात्र, आता हीच लाेकप्रियता अधिकच खटकत आहे. सुपरस्टार हाेणे आता मला अधिकच बाेरिंगसारखे वाटत आहे. कारण, हीच लाेकप्रियता सुरुवातीला मनाला भावणारी असते. मात्र, त्यानंतर ही प्रसिद्धी जड वाटायला लागते. त्यामुळे स्वत:भोवती एक वेगळे वलय निर्माण हाेते. यात अनेकांच्या आशा-अपेक्षांचे आेझे असते. त्यामुळे तुम्हाला स्वत:च्या खासगी आयुष्याला विसरावे लागते. कारण, आजच्या घडीला मी जवळच्या पार्कमध्येही खेळायला जाऊ शकत नाही. कारण, त्यादरम्यान मला चाहत्यांच्या आशा-अपेक्षांचा विचार करावा लागताे. यामुळे माझे सार्वजनिक ठिकाणी जाणेही बरेचसे बंद झाले. याचे माेठे दु:ख आहे. कारण, त्यामुळे माझ्या कुटुंबीयांचा या ठिकाणचा आनंद माझ्यामुळे हिरावला गेला. त्यांनाही या ठिकाणी माझ्यामुळे जाता येत नाही. एकूणच आयुष्यातील अनेक सुखद गाेष्टींना आता मी मुक्त आहे. 

मात्र, हाच लाेकप्रियताचा पल्ला गाठताना मला माेठी मेहनत घ्यावी लागली. हे करताना या सर्व आनंदापासून मी दूर राहिलाे. याच आनंदाच्या माेहापासून दूर राहिल्याने मला यश संपादन करता आले. मात्र, आता हा आनंद घेण्यासाठी मला अनेक अडचणींचा सामना करावा लागताे . 

आता बालपणासारखा मुक्तपणे बागडण्याचा मी विचार करत आहे. या साऱ्या चंदेरी दुनियेपासून दूर राहत मनसाेक्त जीवन जगण्याचा विचार मला सारखा सतावत आहे. वडिलांचे माझ्यावर अधिक प्रेम हाेते. त्यांचा अधिक मा‌झ्यावर जीव हाेता. त्यामुळेच मला दु:खाची कधीही जाणीव झाली नाही. मात्र, ते हयात असेपर्यंत मला त्यांना समजून घेता आले नाही याचीच मला सारखी खंत वाटते.