आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षांच्या मुलाच्या मृतदेहावर हंबरडा फोडणाऱ्या आईने एक घेतला निर्णय आणि बदलले या महिलेचे जीवन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद - चेहऱ्यावर आनंद आहे. या आनंदामध्ये ती आज हसत आहे. आजुबाजुचे वातावरणही उत्साही आहे. या आनंदामागचे कारण आहे जीवन जगण्याची पुन्हा निर्माण झालेली आशा. जीवनातून जो अंधकार नाहीसा होणार आहे त्याचा हा आनंद आहे. अंधपणापासून मिळणाऱ्या मुक्तीचा हा आनंद आहे. 


पाथरडीहच्या राहणाऱ्या ममताच्या जीवनात जग पाहण्याचा आनंद आला आहे एका आईमुळे. त्या आईमुळे जिने अपघातात 13 वर्षांचा मुलगा कायमचा गमावला. मुलाच्या मृतदेहावर रडणाऱ्या या आईने एक निर्णय घेतला. हा निर्णय होता मुलाच्या नेत्रदानाचा. औपचारिकता पूर्ण झाली आणि डॉक्टरांनी या मुलाचे डोळे दान करण्यासाठी जपून ठेवले. नुकतेच डॉक्टरांनी ममताचे ऑपरेशन करत तिच्या जीवनात पुन्हा लख्ख उजेड केला. एका आईच्या निर्णयाने तिला पुन्हा दृष्टी मिळाली. 


आजारपणामुळे गमावले होते डोळे 
ममता जन्मापासून नेत्रहीन नव्हती. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती जेव्हा 6 वर्षांची होती तेव्हा तिला कावीळ झाला होता. त्यानंतरच तिच्या डोळ्याची दृष्टी हळू हळू कमी होऊ लागली. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचे डोळे वाचवण्यात यश आले नाही. गेल्या एक वर्षापासून ती काहीही पाहू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...