आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्करांनी १८ वर्षांत ३३ टक्के वनसंपदा केली नष्ट; सरकार ढिम्म असल्याने ग्रामस्थांनी तयार केली स्वत:ची फॉरेस्ट टीम, आता रात्रंदिवस करतात निगराणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉवेंग| कंबोडियातील राॅवेंगमध्ये बँग खनपल गावाजवळ २ लाख ४२ हजार ५०० हेक्टर भागात वनक्षेत्र आणि अभयारण्य आहे. मात्र तस्करांनी गेल्या १८ वर्षांत धुडगूस घातला. परिणामी एवढ्या वर्षांत एक तृतीयांश जंगलाचा सफाया झाला. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. हे पाहून ग्रामस्थ हताश न होता त्यांनी स्वत:च गस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी टीम तयार करण्यात आली. वन क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकी सहा जणांच्या टीमला तैनात करण्यात आले. तस्करांकडून ताब्यात घेतलेल्या लाकडांपासून तपास केंद्रही उभारण्यात आले. त्यात बहुतांश वयस्कर व्यक्तींचा समावेश आहे. हे लोक तळ करून रात्रंदिवस निगराणीचे काम करतात. जंगल आमच्यासाठी बँकेसारखे आहे. जंगलामुळे आमचे व कुटुंबाचे भरणपोषण होते. फळ, लाकडे, मधासारख्या मौल्यवान गोष्टी जंगलातून मिळतात. त्यामुळे विशेष बचाव दल तयार केल्याचे ६७ वर्षाचे लिम यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...