आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ-मराठवाड्यात दाेन दिवस पावसाचा अंदाज, पुराचा इशारा; बंगालच्‍या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात याच्या परिणामी पावसाचे संकेत आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद‌्भवू शकते, पुरामुळे काही गावांचा संपर्कदेखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला अाहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खान्देशात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. मुंबई आणि कोकणातदेखील यादरम्यान पावसाच्या काही सरी कोसळतील. 

 

बातम्या आणखी आहेत...