आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; अरबी समुद्रातील हालचालींना वेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात हालचालींना वेग अाल्याने राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे २६ दिवसांपासूनच्या मान्सून ब्रेकची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. 


आयएमडीच्या अंदाजानुसार, देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर मान्सून सक्रिय होत आहे. दक्षिण कोकण व गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. येत्या तीन दिवसांत मान्सूनचा आस उत्तरेकडून पुन्हा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण व मध्य भारतात मान्सून सक्रिय हाेऊ शकताे. तसेच १४ ते १७ ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम, मराठवाड्यात मध्यम ते जोरदार व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

बातम्या आणखी आहेत...