Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Post Bank In solapur from today, 22 postmen in service

सोलापुरात आजपासून पोस्टाची बँक, २२ पोस्टमन आहेत सेवेला

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 11:45 AM IST

इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्टाची बँक आपल्या दारी या योजनेचा शनिवारी सोलापुरात प्रारंभ होत आहे. सध्या प्रायोगिक तत

  • Post Bank In solapur from today, 22 postmen in service

    सोलापूर- इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्टाची बँक आपल्या दारी या योजनेचा शनिवारी सोलापुरात प्रारंभ होत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर बार्शी तालुक्यात गौडगाव, मालेगाव, भालगाव, हतीज या चार गावांसह शहरात २२ पोस्टमनच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाणार असल्याची माहिती पोस्ट अधीक्षक सुरेश शिरसी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


    मार्च २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ५० हजार खाती सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. देशभरात ६५० मुख्य शाखा आणि ३,२५० उपशाखांमधून या सेवेला सुरुवात होत आहे. शहरात १४ पोस्टमन आणि ग्रामीण भागात ८ पोस्टमन प्रायोगिक काळात असणार आहेत. डिसेंबर २०१८ अखेर राज्यभरात सर्व गावच्या पोस्ट कार्यालयातून या सेवेला सुरुवात होणार आहे. डिजिटल इंडियात याची संकल्पना थोडी बदलून त्यात आधुनिकता आणली आहे. कोणासही खाते काढावयाचे असल्यास संबंधित पोस्टमन स्वत:च्या मोबाइलवरील अॅपवर हे काम सुलभतेने करणार आहेत.

Trending