आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठात आता 'पोस्ट डॉक्टरल फेलोशिप'ची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देशात वास्तव्यासाठी क्रमांक एकचे शहर ठरलेल्या पुण्यात आता शैक्षणिक क्षेत्रातील संशोधकांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास 'पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप'ची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन मंगळवारी प्र-कुलुगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य सरकारच्या अधिन असलेल्या विद्यापीठांमध्ये (स्टेट युनिव्हर्सिटीज) अशा प्रकारची संधी देणारे पुणे विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. 


या सुविधेमुळे महाराष्ट्रातील विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, मानव्यविद्या, भाषा इत्यादी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनासाठी संधी विद्यापीठात उपलब्ध होणार आहे. संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रा. डॉ. (कॅप्टन) सी. एम. चितळे, प्रा. डॉ. डी. एस. जोग, प्रा. डॉ. एस. आर. गद्रे, प्रा. डॉ. मनोहर जाधव, डॉ. रोहित काळे, श्री. सुबोध खिरे, श्री. सुनील होडे हेही उपस्थित होते. 

 

अशी मिळवता येईल फेलोशिप 
> फेलोशिपबाबतची सविस्तर माहिती http://sppupdf.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर दिली असून, पात्रता निकष पूर्ण असणारे विद्यार्थी १ सप्टेंबर २०१८ नंतर नावनोंदणी करू शकतात. याबाबत परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. 
> संशोधन क्षेत्रात प्रशंसनीय काम केलेल्यांकरिता महाराष्ट्राचे नागरिक असलेल्यांनाच यासाठी प्रवेश मिळणार आहेत. प्रवेश घेताना ३२ वर्षेहून कमी वय असणे अनिवार्य आहे. राखीव जागांसाठी असलेल्या नियमांनुसार वयोमर्यादेतील सवलत कायम राहील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 


फेलोशिपची ठळक वैशिष्ट्ये 
> पीएच.डी नंतर संशोधन क्षेत्रात सखोल काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ अध्यापन क्षेत्राकडे वळू शकेल. परिणामी संशोधन व अध्यापन क्षेत्रात पुढे जाऊन भरीव काम होईल. 
 महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र धारकांनाच 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप (एसपीपीयु - पीडीएफ) प्रोग्राम' या अभ्यासक्रमासाठी पात्र धरण्यात येईल. 
> विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, मानव्यविद्या, भाषा इत्यादी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनाची संधी याद्वारा उपलब्ध होणार आहे. 
> 'एसपीपीयु - पीडीएफ प्रोग्राम' हा पूर्ण वेळ असून या काळात कुठेही व कोणत्याही स्वरूपात नोकरी, संशोधन किंवा इतर शिष्यवृत्ती करण्याची परवानगी नाही. 
> अर्ज आॅनलाइन माध्यमातून भरल्यावर अर्जदारांनी अर्जाची प्रत प्रिंट करून विद्यापीठात संबंधित विभागाच्या कार्यालयात भरणे आवश्यक आहे. अर्ज १ सप्टेंबर २०१८पासून http://sppupdf.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन भरता येणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...