personal finance / 'जेष्ठ नागरिक बचत योजने'वर मिळते बँकेतील FD पेक्षा अधिक व्याज...

मॅच्युरिटीनंतर या योजनेला तीन वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते

दिव्य मराठी वेब

Jun 22,2019 05:57:00 PM IST

यूटिलिटी डेस्क- पोस्ट ऑफिसद्वारे डाक सेवेव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या बँकिंग सेवासुद्धा पुरविल्या जातात. त्यासोबत विविध बचत योजना देखील चालवल्या जातात. याच बचत योजनेपैकी एक योजना म्हणजे 'जेष्ठ नागरिक बचत योजना'. या योजनेअंतर्गत आपल्याला 8 टक्क्यापेक्षा अधिक व्याज दिले जाते. त्यामुळे या योजनेवर बँकेतील ठेवीपेक्षा अधिक व्याज मिळते.

योजनेसंबंधित विशेष माहिती

कधी उघडू शकता खाते?
60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयानंतर खाते उघडू शकता. तसेच, VRS घेणारा व्यक्ती जो 55 वर्षापेक्षा पण, 60 वर्षापेक्षा कमी आहे तोसुद्धा हे खाते उघडू शकतो. या योजनेअंतर्गत पाच वर्षांसाठी पैशाची गुंतवणूक करून मॅच्युरिटीनंतर या योजनेला तीन वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते. तसेच, योजनेअंतर्गत आपण 15 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता.

वार्षिक 8.7 टक्के व्याज
- जेष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केलेल्या ठेवीवर वार्षिक 8.7 टक्के व्याज मिळते. पण या व्याजावर कर द्यावा लागतो.
- या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर 1 एप्रिल, 2007 आयकर अधिनियम, 1961 (Income Tax Act, 1961) च्या कलम 80 सी अंतर्गत सवलतींचा लाभ दिला जात आहे.


योजनेसंदर्भात इतर महत्वाच्या बाबी...

- या योजनेमध्ये आपण जॉइंट खातेसुद्धा उघडू शकता. तसेच, आपल्या खात्यामध्ये एखाद्याला नॉमिनी करू शकता.

- खाते उघडण्यासाठी एक लाख रूपयापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी चेकने द्यावी लागेल.

- हे व्याज त्रेमासिक आधारावर मिळते आणि एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवरीच्या पहिल्या वर्किंग डे दिवशी जमा केले जाते.

- मॅच्यूरिटीचा कालावधी पाच वर्षांचा आहे, पण 1 वर्षानंतरही आपण प्रीमॅच्योर विदड्रॉल करू शकता.

- 1 वर्षानंतर प्रीमॅच्योर विदड्रॉलवर जमा केलेल्या ठेवीवर 1.5 टक्के शुल्क आकारल्या जातो. आणि दोन वर्षानंतर 1 टक्का रक्कम कापून
घेतली जाते.

- हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडता येते.

X
COMMENT