आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या डाएटमुळे सिझेरियन डिलिव्हरीनंतरही फक्त 1 वर्षात कमी केले 28 किलो वजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका गरोदर आईसाठी स्वतःच्या तब्येतीसोबतच गर्भातील बाळाची काळजी घेणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. हरमन सिद्धू नेहमी असा विचार करत होत्या की, त्या सहजपणे आपले प्रेग्नेंसी वेट कमी करतील परंतु सी-सेक्शन (सिझेरियन)डिलिव्हरीने त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले. एवढे घडूनही हरमनने हार पत्करली नाही आणि केवळ एक वर्षात 28 किलो वजन कमी केले. सीएचएल हॉस्पिटल इंदूरच्या गायनेकाॅलॉजिस्ट डॉ. नीना अग्रवाल यांनी सांगितले की, सिझेरियन डिलिव्हरीनंतर सामान्यतः 5 ते 10 किलो वजन एवढ्या लवकर कमी होते. जर एखाद्या महिलेने 28 किलो वजन कमी केले असेल तर ही आश्चर्याची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. असे काही करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आम्ही तुम्हाला सांगत आहोत हरमनची फॅटपासून फिट होण्याची कथा.


कोण आहे हरमन सिद्धू
हरमन एक हाउस वाइफ, फ्रीलांस इंटिरियर डिझायनर, पीजीटी टीचर आणि फिटनेस मॉडेल आहे. वय 30 वर्ष आहे. हरमनचे वजन 85 किलो झाले होते. एक वर्षात तिने 28 किलो वजन कमी केले. हरमनचे प्रेग्नेंसी काळात गरजेपेक्षा जास्त वजन वाढले होते. हरमनला प्रेग्नेंसी काळातील वाढलेले वजन आपण सहजपणे कमी करू असा विश्वास होता. परंतु तिला आपलॆ डिलिव्हरी सी-सेक्शन होईल असे वाटले नव्हते. जवळचे लोक आता वजन कमी होणार नाही असे सांगत होते. हे ऐकून हरमनला खूप वाईट वाटत होते. त्यानंतर तिने वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि करूनही दाखवले. सिझेरियन झाल्यानंतर चार आठवडे आराम करण्याची आवश्यकता असते. टाके वेळेनुसार निघत जातात. रिकव्हरी स्लो होते परंतु महिला इतर महिलांप्रमाणे स्ट्रॉंग होते.


कसा घेतला आहार 
ब्रेकफास्ट : 4 एग व्हाइट, ओट्स, एक स्लाइस ब्रेड, 10 बदाम आणि अक्रोड, मल्टीव्हिटॅमिन आणि ओमेगा 3. 
मिड डे : ग्रीन टी
लंच : ग्रिल्ड चिकन ब्रेस्ट आणि उकडलेल्या भाज्या
संध्याकाळचा स्नॅक्स : एक स्कूप प्रोटीन पाउडर आणि एक बाउल फ्रूट्स
डिनर : फिश आणि चिकन. कधीकधी उकडलेले बटाटे.


वर्कआउट
- आठवड्यातून 6 दिवस दररोज 30 मिनट कार्डियो.


शुगर आणि कार्ब्सचे प्रमाण कमी केले
- साखर आणि लो-कार्ब्स घेतल्यामुळे एक्टीव्ह, एनर्जेटिक आणि फोक्स्ड राहिली. कार्बोहायड्रेट्स आणि साखर कमी केल्यामुळे काही दिवस कमजोरी जाणवली परंतु नंतर एनर्जेटिक फील होऊ लागले.

बातम्या आणखी आहेत...