या मुस्लिम देशात ‘रामायण’वर काढले डाक तिकीट; जटायू युद्धाचा प्रसंग दाखवला

दिव्य मराठी

Apr 26,2019 11:18:00 AM IST
जकार्ता - भारतासाेबतच्या राजनयिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडोनेशियाने ‘रामायण’वर विशेष डाक तिकीट काढले आहे. त्याचे डिझाइन इंडोनेशियन शिल्पकार ‘पद्मश्री’ बपक न्योमन नौरता यांनी बनवले आहे. याबाबत जकार्तातील भारतीय दूतावासाने सांगितले की, या तिकिटावर रामायणातील सीतेला वाचवण्यासाठी जटायू व रावणाचा युद्धप्रसंग दाखवला आहे. ही तिकिटे जकार्ताच्या फिलाटेली संग्रहालयात प्रदर्शनात ठेवली जातील. तिकीट प्रकाशनावेळी भारताचे राजदूत प्रदीपकुमार रावत व इंडोनेशियाचे उपपरराष्ट्रमंत्री अब्दुर्रहमान मो. फकीर उपस्थित हाेते. या कार्यक्रमात १९४९ ते २०१९ पर्यंतचे दाेन्ही देशांच्या संबंधांचे ऐतिहासिक क्षण छायाचित्रांतून दाखवले गेले. इंडोनेशिया हा जगातील सर्वात माेठा मुस्लिमबहुल देश आहे, हे विशेष!
X