आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोर की पोलिस? प्रदीप शर्मा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात झळकले अजब पोस्टर्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नालासोपारा येथे माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसैनिकांची भेट घेण्यासाठी येत आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी शहरात अजब पोस्टर लागले आहेत. त्यामध्ये चोर की पोलिस असा सूचक प्रश्न विचारण्यात आला आहे. नालासोपाऱ्यात हे पोस्टर कुणी लावले याचा काहीच पत्ता नाही. परंतु, माजी पोलिस अधिकाऱ्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या तिसऱ्याच दिवशी हे पोस्टर लागल्याने ही टीका त्यांच्यावरच असल्याचे सांगितले जात आहे.

माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना आपला मुलगा मानत होते असे शर्मा म्हणाले. पोलिस सेवेत असताना जेव्हा-जेव्हा अडचणी आल्या त्यावेळी बाळासाहेबांनी आपली मदत केली असेही ते पुढे म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत प्रदीप शर्मा यांची बंदूक बोलायची. आता त्यांचे मन बोलणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप शर्मा यांना शिवसेनेकडून नालासोपारा येथून उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...