आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 72 दिवसानंतर 40 लाख पोस्टपेड मोबाइल फोन सुरू, इंटरनेट बंदच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात ७२ दिवसांनंतर पुन्हा मोबाइल फोन सुरू झाले आहेत. ४० लाख पोस्टपेड मोबाइल फोनवर सोमवारी दुपारपासून काॅल आणि एसएमएस सेवा सुरू झाल्या. जवळपास २५ लाख प्रीपेड मोबाइल फोन आणि इंटरनेट सेवा सध्या बंद राहतील. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच ऑगस्टला कलम-३७० हटवण्याच्या आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या निर्णयानंतर येथे मोबाइलवरील संपर्क बंद होता. आता पोस्टपेड सुविधा सुरू झाल्यामुळे नागरिक आणि सुरक्षा दलांचे जवान देशातील तसेच जगभरातील आपल्या नातेवाइकांशी बोलू शकतील. सोमवारी पोस्टपेड मोबाइल सुरू झाल्यानंतर काश्मिरी नागरिकांनी परस्परांना ‘ईद मुबारक’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. ईदच्या (१२ आॅगस्ट) एक आठवडा आधी खोऱ्यात दूरसंचार सेवा बंद झाल्या होत्या. 
 

इंटरनेट सुविधाही लवकरच सुरू होईल : राज्यपाल मलिक 
खोऱ्यात इंटरनेट सुविधाही लवकरच सुरू होईल, असे आश्वासन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहे. दूरसंचार सेवांवरील निर्बंधांचा बचाव करताना ते म्हणाले की, काश्मिरी नागरिकांची सुरक्षा मोबाइल संपर्कापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. दहशतवादी आपल्या कारवायांसाठी इंटरनेटची मदत घेऊ शकतात. राज्यात स्थिती सामान्य आहे. गेल्या दोन महिन्यांत कुठलाही हिंसाचार झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...