आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटॅशियम, मॅग्नेशियममुळे हाडांसाठी फायदेशीर स्ट्रॉबेरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीच्या मोसमात लालचुटूक रंगाच्या स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. महाबळेश्वर, पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. स्ट्रॉबेरी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी ते फायदेशीर ठरतेे. म्हणूनच थंडीच्या मोसमात बाजारात येणारी स्ट्रॉबेरी ही भरपूर खावी. स्ट्रॉबेरी सेवनामुळे हृदयविकार आणि मधुमेहावर मात करता येते. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी महत्त्वाची ठरते. ते खाल्ल्यामुळे खूप आराम मिळतो आणि शरीराची झीज भरून निघते. स्ट्रॉबेरी ऑक्साइड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठीदेखील लाभकारक आहे. स्ट्रॉबेरीमुळे मोतीबिंदू होण्यापासून संरक्षण होते. स्ट्रॉबेरी तील 'क' जीवनसत्त्वामुळे डोळ्यांना प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो. स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रिक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असतात. तांबड्या रक्तपेशींच्या अभावाने महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण आपल्याकडे मोठे आहे. स्ट्रॉबेरीमधील पोटॅशियम उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते.

स्ट्रॉबेरीचे फायदे
> स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रिक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात अधिक चमकदार होतात. तसेच हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

> स्ट्रॉबेरीत असणारे अँटिऑक्सिडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्त्वे कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात. स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते.

> स्ट्रॉबेरी खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते, तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात.

> स्ट्रॉबेरीमधील 'फोलेट' हे तत्त्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.

> स्ट्रॉबेरीमुळे वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.

> स्ट्रॉबेरीत मँगनीज हे खनिजद्रव्य आहे त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो, तसेच हाडे दुखण्याचा त्रासही कमी होतो म्हणून थंडीत स्ट्रॉबेरी भरपूर खावी.