आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य उजळ करण्यासाठी उपयुक्त आहे बटाटा, अशा प्रकारे करावा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बटाट्यामध्ये नॅचरल ब्लीचिंग एजेंट्स असतात, जे स्किनचा रंग उजळ करण्यात मदत करतात. चेह-यावरील डाग दूर करण्यापासून तर चेह-याचा रंग उजळ करण्यासाठी बटाटे वापरल्याने फायदा होतो. ब्यूटी एक्सपर्ट निक्की बावानुसार बटाट्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, ज्या रिंकल्स टाळण्यात मदत करतात, त्या सांगत आहेत बटाट्याचे 10 यूज...


- एका बटाट्याच्या रसामध्ये एका अंड्याचा पांढरा भाग मिसळून चेहरा आणि मानेवर लावा. वीस मिनिटानंतर पाण्याने धुवून घ्या. रिंकल्सपासून बचाव होईल.

- एक बटाटा किसून घ्या. यामध्ये चिमुटभर हळद पावडर मिसळून चेह-यावर लावल्याने रंग गोरा होतो.

- एका बटाट्याच्या स्लाइसवर काही थेंब पाणी टाकून हे चेह-यावर पाच मिनिटे रब करा. यामुळे डाग दूर होतील.

- एका बटाट्याचा रस आणि लिंबूचे काही थेंब मिक्स करुन चेहरा आणि हाता पायांवर दहा मिनिटे लावा. यामुळे स्किनचा ग्लो वाढेल.

- एक बटाटा किसून घ्या. यामध्ये मुल्तानी माती आणि गुलाब जल मिसळून चेह-यावर लावा. सुकल्यानंतर धुवून घ्या. यामुळे चेहरा उजळेल.

- एका बटाट्याचा रसामध्ये कच्चे दूध मिसळा. हे स्किनवर लावा आणि वीस मिनिटानंतर धुवून घ्या. यामुळे सावळेपणा दूर होईल.

- एका बटाट्याचे स्लाइस करा. हे डोळ्यांखालील डार्क सर्कलवर पाच मिनिटे ठेवा. याने डार्क सर्कल दूर होतील.

- एक बटाटा बारीक करुन त्यामध्ये कच्चे दूध आणि बदाम तेल मिसळा. हे स्किनवर लावल्याने त्वचेचा सॉफ्टनेस वाढतो.

- एका बटाट्याच्या रसामध्ये 2 चमचे काकडीचा रस मिसळून चेह-यावर लावा. हे अर्ध्या तासानंतर धुवून घ्या. यामुळे चेह-याचा रंग उजळतो.

- एक बटाटा बारीक करुन घ्या. यामध्ये दही मिसळून चेह-यावर लावल्याने चेह-याचा रंग गोरा होतो.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...