आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आधी आपण श्रीनगर घेण्याबाबत बोलायचो, पण आता मुजफ्फराबाद वाचवण्याची वेळ आलीये'- बिलावल भुट्टो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तान पीपल्स पार्टी(पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारीने आज(मंगळवार) काश्मीर प्रकरणी इम्रान खान यांना अपयशी ठरवले. बिलावलने मीडियासमोर म्हटले की, ''सुरुवातील आपण भारतातून श्रीनगर घेण्याचा विचार करायचो, पण आता अशी परिस्थिती झाली आहे की, आता मुजफ्फराबाद वाचवण्याची वेळ आली आहे. इम्रान खान इलेक्टेड नाही सलेक्टेड पंतप्रधान आहेत. सलेक्टेड आणि सलेक्टर्सच्या देशातील नागरिक आता उत्तर मागत आहेत."

‘इम्रान सरकार सगळ्यात अपयशी’ 
इस्लामाबादमध्ये पक्षाच्या एका मीटिंगनंतर मीडियासमोर बिलावलने हे वक्तव्य केले, "आता देशासमोर हे साफ झाले आहे की, इम्रान सरकार सपशेल अपयशी ठरलीये. आधी तुम्ही लोकशाहीसोबत जे केले, ते आम्ही सहन केले. तुम्ही देशाची अर्थव्यवस्था उद्धबस्त केली, आम्ही तेही सहन केले. तुम्ही इतक्या दिवस झोपा काढल्या आणि नंतर विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. तुम्ही झोपत राहिलात आणि मोदीने काश्मीर हिसकाउन घेतला. आधी आफली काश्मीर पॉलिसी काय होती? आपण श्रीनगर घेण्याची योजना करत होतोत, आता सलेक्टेड पीएम खानमुळे अशी अवस्था झाली की, मुजफ्फराबाद वाचवण्याची वेळ आलीये."

सलेक्टेडने सलेक्टेडला पंतप्रधान बनवले
भुट्टो पुढे म्हणाला, "काय आहे आपली फॉरेन पॉलिसी? काय आहे आपली आर्थिक निती? असेच होते, जेव्हा एक सलेक्टेड लष्कराने एका सलेक्टेड व्यक्तीला पंतप्रधान बनवले. हा सलेक्टेड व्यक्ती आपल्या सलेक्टर्सला खूश करण्यासाठी आपल्या देशाला उद्धवस्त करत आहे. जनता महागाईच्या सुनामीमध्ये बुडाली आहे. काश्मीर आपल्या हातातून निघून गेला. आता प्रश्न असा आहे की, आपण कोणाला गुन्हेगार ठरवणार? सलेक्टेडला किंवा सलेक्टर्सला? कोणतेही क्षेत्र पाहा, प्रत्येक ठिकाणी इम्रान खान अपयशी ठरले. आता आपण दोघांकडून उत्तर मागणार."